Agriculture news in marathi, Appointment of Administrator on Solapur District Milk Union canceled | Agrowon

सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची नेमणूक रद्द

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे खासगी प्रशासक शिवराम पापळ यांची नियुक्ती रद्द करत पूर्वीचे शासकीय प्रशासकीय मंडळ कायम ठेवण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने संघाचा कारभार पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हाती सोपवला. या निर्णयामुळे जिल्हा दूध संघ बचाव समितीच्या मागणीला यश मिळाले आहे. 

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे खासगी प्रशासक शिवराम पापळ यांची नियुक्ती रद्द करत पूर्वीचे शासकीय प्रशासकीय मंडळ कायम ठेवण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने संघाचा कारभार पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हाती सोपवला. या निर्णयामुळे जिल्हा दूध संघ बचाव समितीच्या मागणीला यश मिळाले आहे. 

जिल्हा दूध संघावर खासगी प्रशासक नेमल्याने वाद निर्माण झाला होता. जिल्हा दूध संघ बचाव समितीने या निर्णयाला आव्हान देणारे अपील उच्च न्यायालयात दाखल केले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सरकारला संघावर प्रशासक नेमणुकीत हस्तक्षेप करण्याचा मंत्र्यांना अधिकार आहे का? या विषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार बुधवारी (ता.६) झालेल्या सुनावणीत पापळ यांच्या नियुक्तीवर सरकारला उत्तर देता आले नाही. त्यामुळे पापळ यांची नियुक्तीच रद्द करत असल्याचे आणि पूर्वीचे शासकीय प्रशासक मंडळ नियमित केल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायालयाने आता शासकीय प्रशासक मंडळाला प्रशासकपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी जिल्हा दूध संघावरील शासकीय प्रशासक मंडळ हटवून त्याजागी शिवराम पापळ यांची खासगी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश पुणे विभागाचे उपनिबंधक डॉ. महेश कदम यांना दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार कदम यांनी पापळ यांची नियुक्ती केली होती. मात्र, अशा पद्धतीने खासगी व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्ती करता येत नाही, असे सांगत या नियुक्तीच्या विरोधात जिल्हा दूध संघ बचाव समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...