राज्यसभेवर व्हावी प्रयोगशील शेतकऱ्यांची नियुक्‍ती ः रवींद्र मेटकर

अमरावती ः भारताच्या राष्ट्रपतींव्दारा राज्यसभेवर नियुक्‍त होणारा सदस्य हा शेतकरी प्रवर्गातून निवडला जावा, अशी मागणी मातोश्री पोल्ट्रीचे संचालक तसेच प्रयोगशील शेतकरी रवींद्र माणिकराव मेटकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेलाही यामुळे बळ मिळणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भाने लिहिलेल्या पत्रातून मेटकर यांनी केला आहे.
Appointment of Experimental Farmers to Rajya Sabha: Ravindra Metkar

राष्ट्रपतींव्दारा राज्यसभेवर सदस्याची शिफारस केली जाते. गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता राजकीय क्षेत्रातूनच असा व्यक्‍ती निवडला जातो. पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्याकरिता आवश्‍यक बाबींवरही काम सुरू आहे. परंतु त्यासाठीच्या सूचना या शासकीय अधिकारी स्तरावरुनच केल्या जात असल्याने त्या शिफारशींच्या बळावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची आशा धूसर आहे. मात्र, राष्ट्रपतींव्दारे राज्यसभेवर देशातील शेतकऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती झाल्यास त्यांच्याकडून शेतीसमोरील आव्हाने वस्तुदर्शकरित्या मांडण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना या समस्यांची जाण असल्याने हे प्रश्‍न सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना देखील समर्थपणे मांडतील. या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास देशभरातील शेतकऱ्यांसमोर असलेले बहुतांशी प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात अशाप्रकारे शेतीसमोरील प्रश्‍नांची सोडवणूक झाल्यास शेतकऱ्यांना बऱ्याच अंशी दिलासा मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांवर काम करता येईल. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार करावा, अशी मागणी रवींद्र मेटकर यांनी केली आहे.

प्रयोगशील किंवा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या गैरराजकीय शेतकऱ्याची राज्यसभेवर नियुक्‍ती झाली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ समस्या प्रभावीपणे मांडता येतील. उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांची देखील मांडणी होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला देखील यामुळे बळ मिळणार आहे. - रवींद्र मेटकर, शेतीनिष्ठ शेतकरी, म्हसला, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com