सोलापूर जिल्ह्यात तक्रार निवारणार्थ तहसिलदार, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर :तालुकास्तरावर तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणुका केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
Appointment of Tehsildar, Chief Officer for redressal of grievances in Solapur district
Appointment of Tehsildar, Chief Officer for redressal of grievances in Solapur district

सोलापूर : कोरोनासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय, खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, पॅथालॉजी लॅब याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, याची दखल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली आहे. तालुकास्तरावर तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणुका केल्याची माहिती त्यांनी दिली. 

ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. तरीही काही ठिकाणी शासकीय, खासगी रूग्णालये, नर्सिंग होम रूग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, सुविधाबाबतही तक्रारी येत आहेत.

या तक्रारीचे निवारण तालुकास्तरावरच होण्यासाठी तहसिलदार व संबंधित नगरपालिका, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. कोरोनासंदर्भात तक्रारींचे निरसन होण्यासाठी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी कार्यक्षेत्रातील डॉक्टर, नोंदणीकृत खासगी व शासकीय रूग्णालये, नर्सिंग होम, पॅथालॉजी लॅबबाबत जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.  तालुकास्तरावर यांना करा संपर्क  

तालुका, अधिकारी, संपर्क क्रमांक : उत्तर सोलापूर- जयवंत पाटील (९८२३७२२२७४), दक्षिण सोलापूर- अमोल कुंभार (७२४९०५२००४), मंद्रुप- उज्ज्वला सोरटे (८३२९८३७६५०), बार्शी- प्रदीप शेलार (९८८१९७७८६६), अक्कलकोट- अंजली मरोड (९९२१९४८००७), माढा- राजेश चव्हाण (९०२८८६१७७८), करमाळा- समीर माने (९४०५८६०३४८), मोहोळ- जीवन बनसोडे (९७६४००७५७९), पंढरपूर- वैशाली वाघमारे (९८८१७९१००९), मंगळवेढा- स्वप्नील रावडे (७३८५७६४३३०), सांगोला- योगेश खरमाटे (९७६५५९९५९९), माळशिरस- अभिजित पाटील (७७१९९५५८५०).  नगरपालिकास्तरावर यांना करा संपर्क 

मुख्याधिकारी पुढीलप्रमाणे बार्शी- शिवाजी गवळी (९८८१३८०२०६), पंढरपूर- अनिकेत मानोरकर (८०८७५८९०५१), अक्कलकोट- आशा राऊत (७८८७८९३०४५), सांगोला- कैलास केंद्रे (९५७९३१८८७८), मंगळवेढा- पल्लवी पाटील (८६०५९०५४००), करमाळा- वीणा पवार (९४२०६९६७७८), कुर्डूवाडी- कैलास गावडे (९८२२२५३१०८), मैंदर्गी- एन.के. पाटील (९९२२५७७३३१), दुधनी- धैर्यशील जाधव (९९६०२२९६६९), मोहोळ- एन.के. पाटील (९९२२५७७३३१), माढा- चरण कोल्हे (९७३०५६२५८६) आणि माळशिरस- विश्वनाथ वडजे (८३७६०४९३९४)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com