विद्यार्थ्यांना शेतमालाच्या मूल्यवर्धनासह अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना शेतमालाच्या मूल्यवर्धनासह अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना शेतमालाच्या मूल्यवर्धनासह अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण

 वाशीम : कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक साह्याने शेंदुर्जना येथील आप्पास्वामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अन्नप्रक्रिया व शेतमाल मूल्यवर्धन या विषयावर पाचदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. 

या प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. एल. काळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती देत शेतीशी निगडित तसेच शेतीपूरक व्यवसायासंबंधी तंत्रज्ञान मिळविण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र सदैव मदत करेल असे सांगितले.

गृहविज्ञान शाखेच्या शुभांगी वाटाणे यांनी अन्नप्रक्रीया उद्योग, गरज, व्याप्ती व महत्त्व तसेच दालमिल, सोयाप्रक्रीया उद्योग याविषययी मार्गदर्शन करून विविध प्रकारच्या डाळी तयार करणे, तयार झालेल्या डाळीचे मूल्यवर्धित खाद्य पदार्थ याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. भागवत वाघ व सिंधुताई शिंदे यांनी यासाठी सहकार्य केले. त्यानंतर त्यांनी मूल्यवर्धित खाद्यपदार्थांचे विविध पॅकेजिंग तंत्रज्ञान, लेबलिंग, ब्राडिंग, विक्रीकरिता लागणारे परवाने व नोंदणीबाबत सखोल मार्गदर्शन केले. आर. एस. डवरे यांनी यशस्वी उद्योजक होण्याकरिता उद्योजकाच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्याबाबत सादरीकरण केले.

आप्पास्वामी महाविद्योलयाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, प्राचार्य श्री. तिवारी यांनी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com