एकात्मिक जल आराखडा दुरुस्तीस मान्यता

एकात्मिक जल आराखडा दुरुस्तीस मान्यता
एकात्मिक जल आराखडा दुरुस्तीस मान्यता

मुंबई : राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात दुरुस्ती करण्यास राज्य जल परिषदेच्या बैठकीत बुधवारी (ता. २४) मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जल परिषदेची सातवी बैठक झाली.  या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे सचिव (ला.क्षे.वि.) रा. रा. पवार, सचिव (प्रकल्प समन्वय) संजय घाणेकर आदी उपस्थित होते. बैठकीत एकात्मिक राज्य जल आराखड्यात व एकात्मिक कृष्णा खोरे जल आराखड्यात गुंजवणी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्राची आकडेवारी द्वितीय सुप्रमानुसार सुधारित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुंजवणी प्रकल्पाच्या इतर तपशिलामध्ये कोणताही बदल न करता सुधारित सिंचन क्षेत्र २१३९२ हेक्टर व पीक क्षेत्र २७६३७ हेक्टर अशी दुरुस्ती करण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे. कृष्णा-भीमा अस्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आवश्यकता भासल्यास पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सूचित केले.  या बैठकीस कृती गट अध्यक्ष तथा मेरीचे महासंचालक एच. के. गोसावी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. दे. कुलकर्णी, मुख्य अधीक्षक रा. ह. मोहिते, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहीटकर तसेच नागपूरचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com