agriculture news in marathi, approval for new pond in kolhapur district, maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात तीन नवीन तलावांना मंजुरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन नवीन तलावांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन साठवण तर एक लघुसिंचन प्रकल्पाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंधारण विभागाकडे पाठवले होते. ते मंजूर झाले आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी दिली. यातील दोन साठवण तलाव कागल तालुक्‍यात तर एक लघुप्रकल्प चंदगडमध्ये होणार आहे. यामुळे १०६५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन नवीन तलावांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन साठवण तर एक लघुसिंचन प्रकल्पाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंधारण विभागाकडे पाठवले होते. ते मंजूर झाले आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी दिली. यातील दोन साठवण तलाव कागल तालुक्‍यात तर एक लघुप्रकल्प चंदगडमध्ये होणार आहे. यामुळे १०६५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.

कागल तालुक्‍यातील माद्याळ हे गाव डोंगरी व टंचाईग्रस्त भागात आहे. येथे साठवण तलाव व्हावा, अशी स्थानिकांनी मागणी केली होती. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव जलसंधारण महामंडळाकडे पाठवला होता. या साठवण तलावासाठी ५२८.०३  लाख रुपये खर्च येणार आहे. यामुळे सुमारे २६२.५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. कागलमधील बेलेवाडी-मासा गावात दुसरा साठवण तलाव होणार आहे. १ हजार ४८०.७२ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या तलावामुळे ४२७.५ एकर जमीन सिंचनक्षेत्राखाली येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी या तलावाची मागणी केली होती.

चंदगड तालुक्‍यातील इसापूर येथील लघुप्रकल्पालाही या बैठकीत मंजुरी दिली. तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी याबाबतचा पाठपुरावा केला. या लघू प्रकल्पासाठी २० कोटी ७५ लाख ६३ हजार ५२७ रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे ३७५ एकर जमिनीला सिंचन व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय झापाचीवाडी (ता. राधानगरी), वासनोली (ता. भुदरगड), आयरेवाडी (ता. शाहूवाडी), येळवणजुगाई (ता. शाहूवाडी) येथील लघू प्रकल्पाचा सुधारित प्रशासकीय प्रस्ताव पाठवला होता. यात वाढीव निधीची मागणी केली होती. त्यालाही मान्यता मिळाल्याने या प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
लातूरमधील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास...परभणी : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी...
‘केव्हिकें’नी मधमाशीपालनातील उद्योजक...परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान...
नगर जिल्ह्यात गतवर्षीच्या शिल्लक...नगर  ः नगर जिल्ह्याला खरिपासाठी २ लाख ९१...
शिधापत्रिका नसणाऱ्यांना दोन महिन्यांचे...पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या...
नाशिक जिल्ह्यात 'मूठभर कापूस जाळा'...नाशिक : खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही...
बुलडाण्यात २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडे...बुलडाणा  ः यंदा असंख्य अडचणींना सामोरा जात...
पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांत...पुणे  : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ८२ गावांत...
साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या...सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) एकही कोरोना...
कांदा, भाजीपाल्याचे लिलाव कधी ?...सोलापूर : राज्य शासनाने २२ मेपासून राज्यातील...
सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीत वाढ सांगली ः गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने...
शेतकरी संघटनेचे अडगावमध्ये कापूस जाळा...अकोला ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे...
`अम्फान’चा शेतीला मोठा फटका कोलकाता: अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा...
रत्नागिरी : शेती साहित्य, अवजारे उपलब्ध...रत्नागिरी ः कोरोनाबाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील...
सांगली जिल्ह्यात केवळ २४ टक्के पीककर्ज...सांगली ः यावर्षी खरीपासाठी १ हजार ५५७ कोटीचे...
उष्ण, कोरडे हवामान , काही जिल्ह्यात...महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी...
मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर...कोपरगाव, जि. नगर  ः ‘‘कोरोनाचा मुकाबला...
`कुकडी'च्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरू...श्रीगोंदे, जि. नगर  : ‘कुकडी' लाभक्षेत्रातील...
वर्धा प्रशासनातर्फे पीककर्जाचे दस्तऐवज...वर्धा ः पीकर्जासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना...
आम्हा ओढ भाकरीची; आमचं कुठलं आलंय पॅकेज...सांगली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उद्योग,...
शेतकऱ्यांनो, खते, बियाण्यांची बिल पावती...पुणे  ः खरीप हंगामासाठी खते, बियाणे,...