agriculture news in marathi Approval of power substation in Khardedigar, Jirwade | Agrowon

खर्डेदिगर, जिरवाडेतील वीज उपकेंद्राला मंजुरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

नाशिक : कळवण तालुक्यातील खर्डेदिगर येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये, तर जिरवाडे (ह) येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांची महावितरणने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली.

नाशिक : कळवण तालुक्यातील खर्डेदिगर येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये, तर जिरवाडे (ह) येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांची महावितरणने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे आत जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी मिळेल. त्यानंतर लगेच कामाला सुरवात होईल. त्यामुळे खर्डेदिगर व जिरवाडे (ह) परिसरातील ५० गावे व वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांना अखंडित व हक्काची वीज मिळेल.  

खर्डेदिगर व जिरवाडे (ह) परिसरात सध्या मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. वाढती विजेची मागणी असताना वीजचोरीमुळे कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे शेतीपंपांना सुरळीत वीज मिळत नाही. शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्यासमोर व्यथा मांडली होती.

महावितरणकडे प्रस्ताव दाखल करून उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री छगनराव भुजबळ, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे पाठपुरावा करून पवार यांनी मंजुरी मिळवली. 

 ५० गावे, वाड्या, वस्त्यांवर मिळणार वीज   

खर्डेदिगर व जिरवाडे (ह) परिसरातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी वीज उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावून ५० गावे, वाड्या, वस्त्यांवरील वीज प्रश्न सोडवणुकीचे आश्वासन दिले होते. अनुक्रमे ३३ व ११ केव्ही वीज उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे वीजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


इतर बातम्या
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
लातूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा कहर...निलंगा, जि. लातूर : निलंगा तालुक्यासह शिरूर...
खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत देण्याचे...सोलापूर ः ‘‘जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे....
रोपांचा, कलमांचा, बियाण्यांचा पुरवठा...जालना : ‘‘फळझाडांची यशस्वी लागवड करण्यासाठी...
खानदेशात पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंतचजळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठा मिळून...
पावसाच्या तडाख्यात कांद्याचे अतोनात...नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी...
सोलापुरात १५ मेपर्यंत कडक लॅाकडाउनसोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
खानदेशात अर्लीची केळी लागवड सुरूजळगाव ः खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ६२ हजार टन...नांदेड : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक...
कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती...नगर : राज्यातील कृषी प्रवेशप्रक्रिया व कृषी...
मराठा आरक्षण निकालाच्या  विश्‍लेषणासाठी...मुंबई :  सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी)...
दुष्काळी भागातून जमा झाली दोन कोटींची...सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील...
वाढीव पाणीपुरवठा  योजनेसाठी निधी देणारसोलापूर : ‘‘सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी...
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर; वाहतुकीचा...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी...