Agriculture news in marathi Approval of Rs.349. 87 crore draft plan of Solapur district | Agrowon

सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 जानेवारी 2020

सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ३४९.८७ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास रविवारी (ता. २६) मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची नियोजन भवन येथे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक दराडे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ३४९.८७ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास रविवारी (ता. २६) मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची नियोजन भवन येथे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक दराडे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

२०२०-२१ मधील सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी यंत्रणांनी ६६७.२७ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र नियोजन समितीने ३४९.८७ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन योजनेसाठी ११६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाईल, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. 

सुरुवातीस मांडलेल्या सर्व विषयांना या वेळी मान्यता देण्यात आली. शंभरकर यांनी २०१९-२० मधील खर्चाचा आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी ११.४६ कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी २६ लाख रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

आमदार बबनराव शिंदे, भारत भालके, प्रणिती शिंदे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, राम सातपुते, यशवंत माने, सचिन कल्याणशेट्टी, रामहरी रूपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद सदस्य बळिराम साठे, उमेश पाटील, सुभाष माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे उपस्थित होते.

तीन देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा

माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी येथील तुळजाभवानी देवस्थान, उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील श्री क्षेत्र महिबूब सुबानीबाबा देवस्थान आणि बार्शी येथील भगवंत मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.


इतर बातम्या
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...