टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यास मंजुरी

टेंभूच्या सहाव्या टप्प्यास तत्त्वतः मंजुरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली आहे. अंतिम मंजुरी मिळण्यास चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे ३६ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. - हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता
Approval of the sixth phase of the tentbu scheme
Approval of the sixth phase of the tentbu scheme

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. येत्या चार ते सहा महिन्यांत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेतून वंचित असलेल्या ३६ गावांतील सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेत सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील ८० हजार हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. सध्या या योजनेतील ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. योजनेचे पाणी दुष्काळी पट्ट्यात मिळत असल्याने इथली शेती बागायती झाली आहे. त्यामुळे शेतकरी सधन होऊ लागला आहे. वास्तविक पाहता आटपाडी, विटा आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे ३६ गावे या योजनेपासून वंचित होती. ही गावे या योजनेत समाविष्ट करावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र, त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले होते. 

आमदार अनिल बाबर या वंचित गावांना योजनेचे पाणी मिळावे, यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, त्यास यश आले नाही. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यातच जयंत पाटील जलसंपदामंत्री असल्याने टेंभू योजनेचे पाणी वंचित गावांना देण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामुळे सहाव्या टप्प्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या तत्त्वतः मंजुरी मिळाली असली तरी, अंतिम मंजुरी मिळण्यासाठी चार ते सहा महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर या योजनेच पुढील काम सुरू होईल. या वंचित गावांना बंदिस्त पाइपलाइनद्वारेच पाणी दिले जाणार आहे.

अखेर अग्रणी नदी होणार बारमाही

टेंभू योजनेचा सहवा टप्पा हा पारे येथे होणार आहे. तेथून पुढे रेवणसिद्ध या गावातून पाणी उचलून पुढे तामखडी येथे सोडण्यात येणार आहे. या ही नदी जिल्ह्यातील पाच तालुक्यातून पुढे जाते. यामुळे टेंभूचे पाणी अग्रणीत सोडल्याने या पाच तालुक्यातील नदीकाठच्या शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे. 

  •  ३६ वंचित गाव समाविष्ट
  •   ८ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
  •   अग्रणी नदी होणार बारमाही
  •   चार ते सहा महिन्यांत अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com