परभणी जिल्ह्यात सदोतीस हजार हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी मंजूर

परभणी ः ई -पीक पाहणी अंतर्गत परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात मंगळवार (ता.१) पर्यंत ३१ हजार ५३ खातेदार शेतकऱ्यांकडून, तर तलाठ्यांकडून ८५७ खात्यांची पीक पाहणी करण्यात आली.
Approved crop survey of thirty seven thousand hectare area in Parbhani district
Approved crop survey of thirty seven thousand hectare area in Parbhani district

परभणी ः ई -पीक पाहणी अंतर्गत परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात मंगळवार (ता.१) पर्यंत ३१ हजार ५३ खातेदार शेतकऱ्यांकडून, तर तलाठ्यांकडून ८५७ खात्यांची पीक पाहणी करण्यात आली. शेतकरी आणि तलाठी स्तरावरील मिळून एकूण ३७ हजार ३६० हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी मंजूर करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील शेती खात्यांची संख्या ५ लाख ३१ हजार १३३ आहे. या खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ८ हजार ३६८.४६ हेक्टर आहे. मंगळवार (ता.१) पर्यंत ई पीक पाहणीतील ३१ हजार ५३ पैकी २५ हजार ८०८  खात्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचे क्षेत्र ३६ हजार ३२५ हेक्टर आहे. तलाठी स्तरावर पाहणी झालेल्या ८५७  खात्यांचे क्षेत्र १०३४ हेक्टर आहे. 

कृषी आणि महसूल विभागातर्फे निश्चित केलेल्या अंतिम पेरणी अहवालानुसार  यावर्षी  (२०२१-२२) परभणी जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ४६७ हेक्टरवर (११७.८२ टक्के) रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.त्यापैकी केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील ई पीक पाहणी मंजूर करण्यात आली. 

२०२१ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ५ हजार १३५ हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु केवळ ९४ हजार १०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी मंजूर करण्यात आली. त्यात ७७ हजार ७९६ शेतकऱ्यांच्या ९१ हजार ४९८ हेक्टर आणि तलाठी स्तरावर १ हजार ६९० शेतकऱ्यांच्या २ हजार ६०४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. 

ई पीक पाहणीसाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नाही. तलाठी स्तरावर देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप तसेच रब्बी हंगामातील संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई पीक पाहणी अजून झालेली नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com