मंजुरी दिली, आता छावण्या तातडीने सुरू करा

मंजुरी दिली, आता छावण्या तातडीने सुरू करा
मंजुरी दिली, आता छावण्या तातडीने सुरू करा

नगर : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने सर्व बाबी तपासून छावण्याला मंजुरी दिली आहे. ज्या भागात छावण्याला मंजुरी दिली आहे तेथे तातडीने छावण्या सुरू कराव्यात, असे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी सांगितले. छावण्या सुरू करण्याला दिरंगाई केली तर संबंधित संस्थेची परवानगी रद्द करून त्याजागी दुसऱ्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, अशी तंबी द्विवेदी यांनी दिली. 

नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी जनावरे जगवणे अवघड झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाने आतापर्यंत ६७ चारा छावण्या सुरू केल्या आहे. गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात १५१२ गावांत दुष्काळ घोषित केला आहे. त्याठिकाणी शासनाने उपाययोजनाही सुरू केल्या आहे. जिल्ह्यात लहान-मोठी २८ लाख पशुधन आहे. त्याला वाचविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला सरकारने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चारा छावण्यांचे प्रस्ताव संस्थेकडून संबंधित तहसीलदारांकडे येत आहे. त्यानंतर तो प्रस्ताव प्रांताधिकारीकडून पडताळणी करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येत आहे. गेल्या आठ दिवासांपासून प्रस्ताव तपासणीचे काम सुरू आहे. छावणी चालकही टंचाई शाखेसमोर तळ ठोकून असून, प्रशासनही तत्परतेने परिपूर्ण प्रस्ताव मंजूर करीत आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या तब्बल ६७ प्रस्तावांवर मंजुरीची मोहोर उमटवित जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी चारा छावणी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

संबंधित संस्थेस मंजुरी आदेश देतानाच मंजुरी मिळाल्यापासून आठ दिवसांत चारा छावणी सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारीही अचानकपणे मंजूर छावण्यांना भेट देऊन तेथील सुविधेसंदर्भात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. त्यामुळे छावणीचालकांतही चलबिचल सुरू झाली आहे.

मंजुरी दिलेल्या संस्थांनी आठ दिवसांत छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अन्यथा त्यात दिरंगाई आढळल्यास संबंधित संस्थेची परवानगी रद्द करण्यात येणार असून, त्याजागी दुसऱ्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल. - राहूल द्विवेदी, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com