सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावी

शासनाने अगोदर सिंचनासाठी जलवाहिनीची व्यवस्था करावी तसेच धरणातील गाळ, बाष्पिभवन, पाण्याचा मोठ्या प्रमाणातील होत असलेला अपव्यय, कर्मचाऱ्यांची कमतरता, नियोजनशून्य कारभार आदी बाबींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे, असे लोकजागर मंच, वान आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी म्हटले आहे.
Aqueduct should be constructed from ‘Wan’ for irrigation
Aqueduct should be constructed from ‘Wan’ for irrigation

तेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी जलवाहिनीची व्यवस्था करावी तसेच धरणातील गाळ, बाष्पिभवन, पाण्याचा मोठ्या प्रमाणातील होत असलेला अपव्यय, कर्मचाऱ्यांची कमतरता, नियोजनशून्य कारभार आदी बाबींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर किती पाणी शिल्लक राहते याबाबत शेतकऱ्यांना सोबत घेऊन नियोजन केल्यानंतरच वान धरणातील पाण्याचा इतर ठिकाणी नेण्‍याबाबत विचार व्हावा, असे लोकजागर मंच, वान आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी म्हटले आहे.

हनुमान सागर प्रकल्प हा तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी बांधण्यात आला. धरण बांधल्यानंतर धरणातील पाण्याची क्षमता ८४ .४३४ दलघमी आहे. त्यामधील दरवर्षी ३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. ३ दलघमी पाण्याची धरणातून गळती होते. त्यामुळे धरणामध्ये जिवंतसाठा फक्त ७८.४३४ दलघमी इतका आहे. मुळातच सिंचनाकरिता २७.७७२४ दलघमी इतक्या पाण्याची तूट आहे. वान धरणाचे निर्मितीवेळी धरणातील फक्त २२ टक्के पाणीच पिण्यासाठी प्रस्तावित होते. परंतु पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता शासनाने या धरणातून अकोट शहराकरिता ८.६६ दलघमी, तेल्हारा शहराकरिता ३.१६ दलघमी, जळगाव शहराकरिता ४.०२ दलघमी, ८४ खेडी योजनेकरिता ४.२३९ दलघमी, शेगाव शहराकरिता ५.६२ दलघमी तसेच जळगाव तालुक्यातील खेड्यांकरिता ८.४५४ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

अकोला शहर अमृत योजनेकरिता २४ दलघमी पाणी आरक्षित झालेले आहे. परंतु या योजनेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. तेल्हारा-अकोट मतदारसंघातील १५९ खेडी योजनासुद्धा प्रस्तावित आहेत. त्यामुळे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० दलघमी पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. यामुळे मूळ उद्देशाला बाधा पोहोचत आहे. वान धरणावर १२८ पैकी केवळ २० कर्मचारी काम पाहत आहेत. शासनाकडून कालवा साफसफाईबाबत निधी उपलब्ध होत नाही. नादुरुस्त कालव्यांमधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी जलवाहिनीची नितांत गरज आहे, अशी भूमिका गावंडे यांनी मांडली.

पाणी रोखण्यासाठी तेल्हारा येथे आंदोलन वान प्रकल्पाचे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता आरक्षित करण्यात यावे, या व इतर मागण्यांकरिता युवाशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ४)  आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. वान प्रकल्पाचे पाणी बाहेर तालुक्यात न देता तालुक्यातील शेतकऱ्यांना  सिंचनासाठी व पिण्यासाठी द्या व पाणी आरक्षित करा, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा या मागणीसाठी युवाशक्ती संघटनेने आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात शिवाजी चौकातून करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ बैठक आंदोलन करण्यात आले. यावेळी तेल्हारा ठाणेदार दिनेश शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या मोर्चात तेल्हारा शहरातील व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com