agriculture news in marathi, arbitration meeting on agitation of sugarcane chop workers, mumbai, maharashtra | Agrowon

ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची बैठक निष्फळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या सध्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची बैठक निष्फळ ठरली. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत कोयता बंदच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.

मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या सध्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची बैठक निष्फळ ठरली. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत कोयता बंदच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.

ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पंकजा मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर संघाच्या येथील सभागृहात नुकतीच या प्रश्नी बैठक पार पडली. बैठकीस साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगांवकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार केशवराव आंधळे, गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, रामकृष्ण घुले, जीवन राठोड, आबासाहेब चौगुले, राणा डोईफोडे, रामहरी दराडे, महादेव बडे, संजय तिडके, सुखदेव सानप, सुरेश वनवे, विष्णूपंत जायभाये, तात्यासाहेब हुले, सुधाकर लांबे आदींसह विविध ऊसतोड मजूरांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऊस तोडणी व वाहतूक दरात १०० टक्के वाढ करावी, मुकादमांना ३५ टक्के कमिशन द्यावे, कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे हप्ते राज्य सरकार व साखर कारखान्याने संयुक्तपणे भरावेत, मजूरांना तसेच त्यांच्या जनावरांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, मजूरांना पक्की घरे, शुध्द पाणी व शौचालयाची सुविधा द्यावी, ऊस तोडणाऱ्या गरोदर महिला मजूरांना आर्थिक मदतीसह अन्य सुविधा द्याव्यात यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील ऊसतोड कामगार संपावर आहेत.

ऊसतोड मजूरांच्या मागण्या रास्त असून त्यावर प्राधान्याने तोडगा निघावा यासाठी पंकजा मुंडे यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली. ऊसतोड दरवाढीबाबत पूर्वी तीन वर्षांचा करार होता, आता तो पाच वर्षांचा करण्यात आला आहे, असा करार आतापर्यंत झाला नव्हता. या करारानुसार दरवाढ देण्याबाबत तसेच संघटनेने बैठकीत मांडलेल्या विविध मागण्यांविषयी लवादात सविस्तर चर्चा झाली. यावेळी ऊसतोड संघटनेच्यावतीने उपस्थित प्रतिनिधींनी कामगारांचे विविध प्रश्न आणि दरवाढीवर भूमिका मांडली.

मात्र, ऊसतोड मजूरांच्या मागण्यांविषयी लवादाच्या बैठकीत चर्चा झाली असली तरी निर्णय झालेला नाही, त्यामुळे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...