आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा उत्सर्जनामध्ये आघाडीवर

आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते.
Birch shrub in the tundra region
Birch shrub in the tundra region

आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते. या गृहितकाचा अभ्यास स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, हे गृहितक चुकीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते. या गृहितकाचा अभ्यास स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, हे गृहितक चुकीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. बिर्चसारख्या काही वनस्पतींमुळे होणाऱ्या कर्बाच्या शोषणापेक्षाही त्यांच्यामुळे मातीतील कर्बाचे होणारे उत्सर्जन अधिक असल्याचे अभ्यासातून लक्षात आले आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. बहुतांश प्रारूपांमध्ये कार्बनचे वहन आणि जमिनीखाली होणारी त्याची साठवण याचा फारसा विचार केला जात नाही. बाहेरून मातीमध्ये जमा होणाऱ्या कार्बनच्या जमिनीतील कार्बन आणि सूक्ष्मजिवांच्या कार्यपद्धतीवर होणाऱ्या परिणामांचाही विचार होत नाही. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आर्क्टिक पर्यावरणामध्ये बहुतांश कार्बन हा माती आणि बर्फाखाली दबलेल्या मातीमध्ये (अशा गोठलेल्या मातीला इंग्रजीमध्ये ‘पर्माफ्रॉस्ट’ असे म्हणतात.) थंड वातावरणामुळे विविध मृत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजिवांच्या अर्धवट कुजण्यातून सेंद्रिय कर्ब तयार होतो. स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नवीन संशोधनामध्ये आर्क्टिक झुडपांच्या साठ्याचे मातीतील कार्बनवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्याचे कार्बन साठवण आणि एकूण पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात आला. त्याविषयी माहिती देताना प्रो. वुके म्हणाले की, उष्ण आणि हिरव्या आर्क्टिक प्रदेशामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणातून कमी होण्यास मदत होईल, असे निष्कर्ष पूर्वीच्या काही अभ्यासामध्ये काढले होते. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये येथील मातीतून होणाऱ्या कार्बन ऱ्हासाचा दर काढण्यात आला. या प्रक्रियेतून कार्बन पुन्हा वातावरणामध्ये मिसळला जातो. त्याचे प्रमाण कार्बनच्या शोषणापेक्षा जास्त असू शकते. सध्याच्या पर्यावरण आणि वातावरणविषयक प्रारूपांमध्ये हे लक्षात घेतले जात नाही. असे झाले संशोधन एडिनबर्ग विद्यापीठातील डॉ. लोर्ना स्ट्रिट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात स्टर्लिंग विद्यापीठातील प्रो. फिलिप वुके, डॉ. जेन आर्ने-सबके यांच्यासह कॅनडा येथील संशोधकांचाही समावेश होता. २०१३ आणि २०१४ मध्ये गेल्या ५० वर्षातील कॅनडा येथील वायव्येतील मॅकेन्झी पठारी प्रदेशातील वनस्पती आणि मातीतील कार्बनच्या चक्राचा अभ्यास करण्यात आला. त्यात संशोधकांच्या गटाला आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातील बिर्च या झुडपातून जुना कार्बन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असल्याचे पुरावे मिळाले. हा जुना कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेतून ५० वर्षापेक्षा दीर्घकाळामध्ये शोषलेल्या आणि मातीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपामध्ये जमा झाला होता. मात्र, दुसऱ्या आल्डर नावाच्या झुडपांबाबत कर्ब उत्सर्जन तितके झाले नाही. त्याविषयी बोलताना डॉ. लोर्ना स्ट्रिट म्हणाल्या की, आमच्या मते बिर्च झुडपांमध्ये प्रकाश संश्लेषणातून तयार झालेली उत्पादने ही बुरशीच्या सहजीवी पद्धतीने मातीपर्यंत नेली जातात. या बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यातून नायट्रोजन व अन्य घटक मोकळे करतात. या उपलब्ध झालेल्या नायट्रोजनमुळे बिर्चची वाढ होते. याच्या उलट आल्डर या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची उत्पादने ही वनस्पतींच्या अवयवामध्ये साठवते. वातावरणातून नत्राच्या स्थिरीकरणासाठी व नत्राच्या उपलब्धतेसाठी ती मुळाच्या आसपास असलेल्या अन्य सूक्ष्मजीवांची मदत घेते. बिर्च वनस्पतींमुळे हिरव्या होणाऱ्या टुंड्रा प्रदेशामध्ये पुढील दशकांमध्ये कर्बाचे स्थिरीकरण होण्याऐवजी मातीमध्ये सध्या साठवल्या गेलेल्या कर्बाचेही उत्सर्जन वाढू शकते. असा निष्कर्ष या अभ्यासातून आला. त्यानंतर उंचावरील प्रदेशामध्ये बर्फाच्छादित जमिनीतून (पर्माफ्रॉस्ट) होणाऱ्या संभाव्य कार्बन उत्सर्जनाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. ते प्रमाण ० ते २०० गीगा टन इतके प्रचंड असू शकते. २०० गीगा टन म्हणजे सध्याच्या मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या एकूण जागतिक कर्ब उत्सर्जनाच्या २० वर्षाइतके प्रमाण होय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com