संशोधनावर तुम्ही तरी समाधानी आहाता का? ः कृषिमंत्री भुसे

संशोधनावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होतो. असे असले तरी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल वाया जातो. मात्र, झालेल्या संशोधनावर आपण तरी समाधानी आहात का, असा प्रश्न कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला. कृषिमंत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठातील अधिकारी निरुत्तर झाले.
Are you satisfied with the research? : Agriculture Minister Bhuse
Are you satisfied with the research? : Agriculture Minister Bhuse

नगर ः शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याची मोठी जबाबदारी कृषी विद्यापीठांवर आहे. एका संशोधनावर लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. संशोधनावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होतो. असे असले तरी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल वाया जातो. मात्र, झालेल्या संशोधनावर आपण तरी समाधानी आहात का, असा प्रश्न कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला. कृषिमंत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठातील अधिकारी निरुत्तर झाले.

कृषिमंत्री भुसे यांनी सोमवारी (ता. ७) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अनेक विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करत माहिती घेतली. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ, मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी रफीस नाईकवाडी व सुधाकर बोराळे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ उपस्थित होते.

भुसे यांनी जंगली निवडूंग प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ संशोधन प्रकल्प, पाणलोट विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, कोरडवाहू फळ संशोधन, कृषी अवजारे, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदींसह प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. बहुतांश विभागाच्या भेटीत समाधानकारक संशोधने दिसली नसल्याने भुसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

विद्यापीठांच्या संशोधनावर शेतकरी अवलंबून असताना समाधानकारक संशोधन होत नसतील तर सरकारचा कोट्यवधींचा निधी वाया जात आहे. तुम्हीच तुमच्या संशोधनावर समाधानी नसाल तर शेतकऱ्यांना काय समृद्ध करणार, असा प्रश्न उपस्थित करत चांगल्या संशोधनावर भर देण्याची अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

अधिकारी, शास्त्रज्ञांची दमछाक कृषिमंत्री भुसे यांची विद्यापीठ भेट अचानक ठरली. त्यानंतर विद्यापीठाने ते कुठे कुठे भेटी देतील याबाबत पत्र तयार केले. मात्र प्रत्यक्ष भेटीवेळी भुसे अचानक कोणत्याही विभागात तसेच प्रक्षेत्रावर जात होते. त्यामुळे कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन कोलमडत असल्याने अधिकारी, शास्त्रज्ञांची चांगलीच दमछाक झाली. त्यांनी प्रक्षेत्रावर काम करत असलेल्या मजुरांशी संवाद साधून चौकशी केली. थेट मजुरांना भेटून चौकशी करणारे भुसे आतापर्यंतचे पहिलेच कृषिमंत्री आहेत. येथील जैवतंत्रज्ञान प्रकल्पाला भेट देऊन भुसे यांनी जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचा कारभार उघडा पाडला. शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून खरेदी केलेल्या मशिन बंद असल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात एकही संशोधन झाले नसल्याची बाबही समोर आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com