नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट

नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख ५८ हजार ४८२ हेक्टरवर (७७.५७ टक्के) खरीप पिकांची पेरणी झाली. त्यातून अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रात यंदा घट झाल्याची स्थिती समोर आली. एकूण १ लाख ४१ हजार ७१७ हेक्टरवर (५७.२१ टक्के) भात, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद आदी अन्नधान्य गटातील पिकांची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात भात, ज्वारी, मका आदी तृणधान्याचे सर्वसाधारण ९९ हजार ८६४ हेक्टर क्षेत्र आहे. परंतु, यंदा २७ हजार ३१ हेक्टरवर (२७.०७ टक्के) तृणधान्याची पेरणी झाली. ज्वारीचे पेरणी क्षेत्र २५ हजार ९४२ हेक्टर आहे. भाताची १७३, तर मक्याची ८९८ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४७ हजार ८३९ हेक्टर आहे. परंतु, १ लाख १४ हजार ६८६ हेक्टरवर (७७.५७ टक्के) पेरणी झाली. 

तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार २६२ हेक्टर आहे. त्यापैकी तिची ५९ हजार ६४१ हेक्टवर (८०.३१ टक्के), मुगाची २६ हजार ९३६ हेक्टरपैकी २३ हजार १५ हेक्टरवर (८५.४४ टक्के), उडदाची ४६ हजार २८७ हेक्टरपैकी ३१ हजार ७४६ हेक्टरवर (६८.३१ टक्के) पेरणी झाली. गळित धान्यांची ३ लाख २ हजार ६५६ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४४ हजार ४५७ हेक्टर आहे. पेरणी मात्र ३ लाख २ हजार ६५६ हेक्टरवर (१२५.३५ टक्के) झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टर)

पीक प्रकार  सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र  टक्केवारी
तृणधान्य ९९८६४   २७०३१  २७.०७
कडधान्य १४७८३९ ११४६८६    ५७.२१
गळितधान्य  २४४४५७   ३०२६५६   १२३.८१
कपाशी ३४१३४९   २१४१०९ ६२.७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com