खानदेशात कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढले 

खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढणार असून, ते सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत. गेले दोन वर्षे सतत बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र किंचित वाढले आहे.
The area under onion seed production increased in Khandesh
The area under onion seed production increased in Khandesh

जळगाव ः खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढणार असून, ते सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत.  गेले दोन वर्षे सतत बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र किंचित वाढले आहे. गेल्या वर्षी या बीजोत्पादनासाठी आवश्यक कांदा किंवा बल्ब महाग असताना देखील क्षेत्र वाढले होते. यंदा कांदा स्वस्त आहे. त्यामुळे बीजोत्पादनाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. बीजोत्पादनासाठी ८०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल या दरात बल्ब उपलब्ध होत आहेत. थेट व्यापाऱ्यांकडून बीजोत्पादक खरेदी करीत आहेत. लागवड बऱ्यापैकी झाली आहे. तर काही शेतकरी अजूनही लागवड करीत आहेत.  गेल्या वर्षी सुमारे ४३०० हेक्टरवर कांदा बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र होते. नंदुरबारात नवापूर, धुळ्यात धुळे, साक्री, जळगावात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, जामनेर, रावेर या भागात बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर कांदा बीजोत्पादन केले जाईल, असे दिसत आहे. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत करार करून या बाबत कार्यवाही करून घेतली आहे. काही कंपन्यांनी कांदा बियाणे खरेदीचे दरही शेतकऱ्यांसोबत चर्चा करून निश्‍चित केले आहेत. त्यात कंपन्या शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी आवश्यक बल्ब, खते, कीडनाशके पुरवीत आहेत. त्यामुळे कांदा बीजोत्पादन खानदेशात सतत वाढत असल्याचेही दिसत आहे.  यंदा पावसाळी किंवा खरिपातील कांदा कमी उपलब्ध होत आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा बीजोत्पादनासाठी अधिकचा उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे पुढे उन्हाळ कांद्याचे बियाणे अधिकचे बाजारात येईल. तर पावसाळी किंवा खरिपातील लागवडीच्या कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा राहील, असेही दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com