नगर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र साडेतीन हजार हेक्टरने वाढले

नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवणीचा प्रश्न तयार झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येऊनही जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र साडेतीन हजाराने तर एकूण तेलबियांचे क्षेत्र साडेसहा हजार हेक्टरने तेलबियांचे क्षेत्र वाढले आहे. कारळे, तिळाचे क्षेत्र मात्र कमी झाले आहे.
The area under soybean in Nagar district has increased by three and a half thousand hectares
The area under soybean in Nagar district has increased by three and a half thousand hectares

नगर ः नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवणीचा प्रश्न तयार झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येऊनही जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र साडेतीन हजाराने तर एकूण तेलबियांचे क्षेत्र साडेसहा हजार हेक्टरने तेलबियांचे क्षेत्र वाढले आहे. कारळे, तिळाचे क्षेत्र मात्र कमी झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचे ५४,२९४ सरासरी हेक्टर क्षेत्र असून एकूण तेलबियायांचे यंदा सरासरी क्षेत्र ६३,९८१ हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा १४९ टक्के तेलबियांची १ लाख २ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी सरासरी तुलनेत १२७ टक्के म्हणजे ९५४८६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सोयाबीनची ९२ हजार ४८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी ८८,९०५ हेक्टरवर पेरणी झाली होती. भुईमुगाच्या क्षेत्रातही यंदा वाढ झाली आहे. यंदा ८९२६ हेक्टरवर तर गेल्यावर्षी ५६९९ हेक्टरवर पेरणी झाली होती. तीळ, कारळ्याच्या क्षेत्रात मात्र यंदा गतवर्षीपेक्षा घट झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवणीचा प्रश्न तयार झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येऊनही नगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र साडेतीन हजाराने तर एकूण तेलबियांचे क्षेत्र साडे सहा हजार हेक्टरने तेलबियांचे क्षेत्र वाढले आहे.

तेलबियांचे तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः नगर - ९६८२, पारनेर - ३४६८, श्रीगोंदा - ४०३, कर्जत - ७०५, जामखेड - ६४५६, शेवगाव - १४४९, पाथर्डी - १६४०, नेवासा - ६३४१, राहुरी - ४१३६, संगमनेर - १४३३८, अकोले - ८७८४, कोपरगाव - २१६६७, श्रीरामपूर - १२३३३, राहाता - १०६४१.

पीकनिहाय क्षेत्र तर कंसात गतवर्षीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोयाबीन ९२४८५ (८८,९०५)
भुईमूग ८९२६ (५६९९)
तीळ ४७ (१२६)
कारळे ४५ (४६१)
सूर्यफुल ४०९ (१९२)
इतर १४१ (१०३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com