agriculture news in Marathi, arecanut in threat due to heavy rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

अतिवृष्टीनतंर सुपारी फळगळीला सुरवात झाली आहे. हे प्रमाण मोठे असून पुढील काही दिवस अशीच फळगळ होत राहिली तर झाडावर फळच शिल्लक राहणार नाही असा धोका आहे. सुपारी पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. संपूर्ण पीकच वाया गेले, तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.
- गणेशप्रसाद गवस, शेतकरी, सावंतवाडी

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता सुपारी पीकही धोक्यात आले आहे. पाऊस ओसरल्यानंतर बुरशी आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फळगळीमुळे सुपारीच्या झाडाखाली फळांचा खच पडला आहे. त्यामुळे सुपारी बागांवर अर्थकारण चालणाऱ्या दोडामार्ग, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी येथील शेतकरी आणखी एका संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे १ हजार १४६ हेक्टर क्षेत्र सुपारी पिकाखाली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आणि मालवण या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. येथील काही शेतकऱ्यांचे अर्थकारण सुपारी आणि नारळ पिकांवरच अवलंबून आहे. सिंधुदुर्गात ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत सलग अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने भातशेती, केळी, फळबागांसह विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुपारी बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पुढे येत आहे.

सतत पडलेल्या पाऊसामुळे सुपारीच्या फळांना बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय फळगळीने बागायतदार हैराण झाले आहेत. बागांमध्ये पक्व होण्याच्या स्थितीत असलेली फळे गळून पडत असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. येत्या दोन महिन्यांत ही फळे परिपक्व होणार होती. सुपारीला गोव्यात मोठी मागणी आहे. येथील सर्व माल गोव्यात चांगल्या दराने विकला जातो. परंतु ही सर्व पिकेच आता हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पिकांवर ज्या शेतकऱ्यांचे अर्थकारण आहे. त्यांची मात्र झोप उडाली आहे.

तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये): सावंतवाडी-४५९, दोडामार्ग-६७, वेंगुर्ला-१५२, कुडाळ-२३६, मालवण-१६६, कणकवली-३९, देवगड-१४, वैभववाडी-८

प्रतिक्रिया
माड आणि सुपारीचे झाड मोडले तर त्याची शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. परंतु आता अतिवृष्टीमुळे फळगळीचे संकट ओढवले आहे. या नुकसानीचे पंचनामेदेखील कृषीचे अधिकारी करीत नाहीत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
- दीपक सिद्धये, बागायतदार, कोलझर, सावंतवाडी


इतर अॅग्रो विशेष
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...