रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का हर्बीवॉश’

फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक कीडनाशकांची फवारणी होते. मात्र काढणीपश्चात फळे व भाजीपाला यांच्या पृष्ठभागावर त्यांचे अवशेष शिल्लक असतात. हे घटक मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात.
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का हर्बीवॉश’
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का हर्बीवॉश’

नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक कीडनाशकांची फवारणी होते. मात्र काढणीपश्चात फळे व भाजीपाला यांच्या पृष्ठभागावर त्यांचे अवशेष शिल्लक असतात. हे घटक मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेच्या (आयआयएचआर) अन्न सुरक्षा विभागाने संबंधित मालाच्या पृष्ठभागावरून हे अवशेष दूर करण्यासाठी वनौषधींपासून अर्का हर्बीवॉश हे उत्पादन विकसित केले आहे. संस्थेच्या अन्न सुरक्षा विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देबी शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. 

बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यानंतर ती पाण्याने धुतली जातात. मात्र त्यांच्या पृष्ठभागावर रासायनिक कीडनाशकांचे अवशेष शिल्लक राहण्याची शक्यता असते. मात्र यावर पर्याय म्हणून विविध वनस्पती एकत्र करून व त्यांची भुकटी तयार करून अर्का हर्बीवॉश हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. यासाठी पाच वर्षे सातत्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देबी शर्मा यांच्यासह ३ प्रमुख शास्त्रज्ञ व एक तंत्रज्ञान सहकारी यांच्या चमूने हे संशोधन यशस्वी केले आहे. फळे आणि भाज्यांवरील अवशेष दूर करण्यासाठी बाजारात काही उत्पादने आहेत, मात्र त्यामध्ये रसायनांचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच काही उत्पादने अशी आहे की त्यांच्यावरील संशोधनाचे परिणाम स्पष्ट झालेले नाहीत. मात्र ''अर्का हर्बीवाश'' हे पूर्णपणे सुरक्षित वनस्पतीयुक्त उत्पादन आहे. ज्या माध्यमातून शेतमालावरील कीडनाशकांचे अवशेष ३० टक्क्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक प्रमाणात काढून टाकता येतील असे प्रयोगाअंती दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे उत्पादन स्वस्त असून ते सहजपणे तयार केले जाऊ शकते. या उत्पादनाचा वापर पाण्यात मिसळून किंवा हाताने चोळून केल्यास चांगले परिणाम समोर आले आहेत. फळे व भाजीपाल्यांवरील पृष्ठभागावर असलेल्या कीडनाशकांच्या प्रकारानुसार हे अवशेष काढून टाकण्याची शक्यता ८० ते १०० टक्के आहे. 

असे तपासले उत्पादनाचे परिणाम गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सहा प्रकारच्या शेतमालावर या उत्पादनाचा प्रयोग करण्यात आला. फळांमध्ये द्राक्ष, आंबा तर फळभाज्यांमध्ये टोमॅटो, भेंडी, वांगी आणि काकडी यावर त्याचे परिणाम तपासण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com