agriculture news in Marathi, Army Fall warm on maize in Nashik district, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा विळखा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

बीजप्रक्रिया केलेल्या क्षेत्रावर कंपन्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत प्रादुर्भाव झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पिकात बदल करावा.
- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला

नाशिक : लष्करी अळीपासून पीकसंरक्षण होईल या आशेने बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची लागवड केली.  मात्र, जिल्ह्यात मका पिकावर अनेक ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. त्यामुळे कंपन्यांनी केलेला दावा फोल ठरल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. 

जिल्ह्यात मक्याचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर आहे. त्यापैकी ९ जुलै अखेर १ लाख २ हजार १४५ हेक्टरवर लागवड झाली. यंदा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची किंमत ४०० ते ५०० रुपयांनी अधिक आहे. लागवडीनंतर २२ दिवसांच्या कालावधीत लष्करी अळीपासून संरक्षण करण्याचा दावा काही कंपन्यांकडून करण्यात आला. मात्र १० ते १२ दिवसात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर, देवळा, मालेगाव तालुक्यात समोर आले आहे. त्यामुळे अधिक किंमत घेऊन फसवणूक झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. 

लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त खर्च करून कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. बियाणे दरात झालेली वाढ व कीटकनाशकांवरील खर्च यामुळे एकरी २ ते ३ हजार रुपये वाढला आहे. जिरायत व बागायती क्षेत्रात येणारे मका पीक अमेरिकन लष्करी अळीला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहे. त्यामुळे उत्पादनासह चाऱ्याचा प्रश्‍न उद्‍भवण्याची मोठी शक्यता आहे.

शासनाने फसव्या दाव्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे
लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून या नुकसानीची व कंपनीने कोणत्या आधारावर मका पिकावर लष्करी अळी रोखण्याचे दावे केले हे तांत्रिकदृष्ट्या तपासून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. 

प्रतिक्रिया
लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी बीजप्रक्रिया केलेले बियाणे घेतले. मात्र मका उगवल्यानंतर सातव्या दिवशी प्रादुर्भाव दिसून आला. झालेला खर्च वाया गेला आहे.
- बापूसाहेब नरोडे, मका उत्पादक, नांदेसर, ता. येवला 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...