agriculture news in Marathi, army worm spotted in telngana, Maharashtra | Agrowon

तेलंगणातही आढळली लष्करी अळी

वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये लष्करी अळी आढळली आहे. सध्या राज्यात फक्त मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचे नमुने बॅंगलोर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
- सी. पार्थसारथी,  मुख्य सचिव, कृषी विभाग, तेलंगणा

हैदराबाद ः लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात आल्याचा इशारा अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) दिला आहे. भारतात कर्नाटक राज्यात पहिल्यांदा लष्करी अळी आढळली होती. त्या वेळी तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त करून अळीचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कर्नाटकपाठोपाठ शेजारच्या तेलंगणा राज्यातही लष्करी अळी अाढळली आहे. 

लष्करी अळीने २०१६ पासून आफ्रिका खंडात थैमान घातले. अनेक देशांतील पिकांचा फडशा या अळीने पाडला त्यामुळे या किडीला अतिशय घातक मानले जाते. ‘एफएओ’ने भारतालाही लष्करी अळीमुळे धोका असल्याचे सांगितले होते. हा धोका खरा ठरत कर्नाटकात सर्वप्रथम लष्करी अळी आढळली होती. त्यानंतर शेजारच्या तेलंगणा राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळला आहे. ‘‘राज्यातील करिमनगर, कामारेड्डी, संगारेड्डी, मेडाक आणि गडवाल या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी लष्करी अळी आढळली आहे,’’ असे तेलंगणाचे कृषीचे मुख्य सचिव सी. पार्थसारथी यांनी सांगितले.    

‘‘सध्या या जिल्ह्यातील काही ठिकाणी केवळ मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवरच आहे. प्रादुर्भाव झालेल्या भागात तपासणीसाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्यात आले आहे. तसेच, ठिकाणी किडीचे आणि पिकाचे नमुने तपासण्यासाठी बॅंगलोरला पाठविण्यात आले आहेत. सोबतच किडीवर नियंत्रण आणण्यासाठी कीटकनाशक फवरणी आणि इतर घ्यावयाची काळजी या विषयी कृषी विभाग आणि कृषी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे,’’ असेही सी. पार्थसारथी म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...