परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा तालुक्यातील परडा शिवारात अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकाची पाहणी केली. मक्यावर अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षात झाल्याने या हंगामात शेतकरी सुरवातीपासूनच चिंतातुर आहे. वऱ्हाडात बुलडाणा, मोताळा तालुक्यात मक्याची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. या वर्षी ही लागवड वाढली. परडा गावात ५० टक्के क्षेत्रावर मका पेरण्यात आलेला आहे. साधारणतः २० ते २५ दिवसांपूर्वी लागवड झालेल्या मक्याच्या पिकावर या गावशिवारात अळीचा ५ ते १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी (ता. १६) मोताळा तालुका कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परडा येथील सागर जवरे, जगन्नाथ जवरे, विश्वास पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिली. एकट्या जवरे कुटुंबात मक्याचे १२ ते १४ एकरांवर लागवड झालेली आहे. या भेटीमध्ये कर्मचाऱ्यांनी मक्याची पाहणी करीत अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत. या हंगामात अमेरिकन अळीची शक्यता पाहता कृषी विभागाने सुरवातीपासून जनजागृतीवर जोर दिला आहे.  

थोडी लागण दिसून आली कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी मोताळा तालुका येथे परडा शिवारात भेट दिली. तालुका कृषी अधिकारी के. एल. कंकाळ, कृषी पर्यवेक्षक ए. ए. इलग, व्ही. आर. धांडे, कृषी सहायक कांचन भिवसनकर, आत्माचे बी. बी. चित्रांक यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही शेतात अळीचा थोडा प्रादुर्भाव दिसून आला. सद्यःस्थितीत नुकसानीची पातळी गाठलेली नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com