Agriculture news in marathi; armyfall warm on maize, akola, maharashtra | Agrowon

परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा तालुक्यातील परडा शिवारात अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकाची पाहणी केली.

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा तालुक्यातील परडा शिवारात अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकाची पाहणी केली.

मक्यावर अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षात झाल्याने या हंगामात शेतकरी सुरवातीपासूनच चिंतातुर आहे. वऱ्हाडात बुलडाणा, मोताळा तालुक्यात मक्याची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. या वर्षी ही लागवड वाढली. परडा गावात ५० टक्के क्षेत्रावर मका पेरण्यात आलेला आहे. साधारणतः २० ते २५ दिवसांपूर्वी लागवड झालेल्या मक्याच्या पिकावर या गावशिवारात अळीचा ५ ते १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी (ता. १६) मोताळा तालुका कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परडा येथील सागर जवरे, जगन्नाथ जवरे, विश्वास पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिली. एकट्या जवरे कुटुंबात मक्याचे १२ ते १४ एकरांवर लागवड झालेली आहे.

या भेटीमध्ये कर्मचाऱ्यांनी मक्याची पाहणी करीत अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत. या हंगामात अमेरिकन अळीची शक्यता पाहता कृषी विभागाने सुरवातीपासून जनजागृतीवर जोर दिला आहे.  

थोडी लागण दिसून आली
कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी मोताळा तालुका येथे परडा शिवारात भेट दिली. तालुका कृषी अधिकारी के. एल. कंकाळ, कृषी पर्यवेक्षक ए. ए. इलग, व्ही. आर. धांडे, कृषी सहायक कांचन भिवसनकर, आत्माचे बी. बी. चित्रांक यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही शेतात अळीचा थोडा प्रादुर्भाव दिसून आला. सद्यःस्थितीत नुकसानीची पातळी गाठलेली नाही.
 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...