Agriculture news in Marathi Arrange funds for unorganized workers | Agrowon

असंघटित कामगारांसाठी निधीची व्यवस्था करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

मुंबई : कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची व्यवस्था करावी. घरी रहावे लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळावी. लघु, मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून कर्जवसुली करण्यास बॅंकांना एक वर्ष प्रतिबंध करावेत आदी मागण्यांचे निवेदन विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (ता. २३) देण्यात आले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची व्यवस्था करावी. घरी रहावे लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळावी. लघु, मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून कर्जवसुली करण्यास बॅंकांना एक वर्ष प्रतिबंध करावेत आदी मागण्यांचे निवेदन विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (ता. २३) देण्यात आले आहे.

कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, डॉ. गणेश देवी, माजी खासदार राजू शेट्टी आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले केले आहे की, संपूर्ण देश कोरोना साथीच्या आपत्तीला सामोरा जात असताना देशातील व विशेषत: राज्यातील असुरक्षित व असंघटित समूहांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक सूचनाही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोनाची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्यापक प्रमाणात जनतेच्या तपासणीची व्यवस्था करावी; विशेषतः सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची व्यापक आणि प्राधान्याने तपासणी करावी.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्यादा आर्थिक तरतूद जाहीर करावी. तपासणी, रुग्णालयात विशेष खाटा, विलगीकरण कक्ष, व्हेंटीलेटर आणि मास्क सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरेश्या प्रमाणावर पुरवाव्यात. खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार करावेत. जनधन खाती असलेल्यांना आणि दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना तातडीने ५,००० द्यावेत. यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पुरेसे आर्थिक साह्य करावे.


इतर ताज्या घडामोडी
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...