Agriculture News in Marathi Arrears of electricity in Sangli 421 crore | Page 4 ||| Agrowon

सांगलीत वीजेची थकबाकी  ४२१ कोटी रुपयांवर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

राज्यातील ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत तीन कंपन्यांसमोर थकबाकी व कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्यास राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सांगली : राज्यातील ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत तीन कंपन्यांसमोर थकबाकी व कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्यास राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातही वीज थकबाकी वाढत चालली असून, सध्या सर्व प्रकारच्या ५ लाख ४१ हजार ग्राहकांकडील थकबाकी ४२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
 
ऊर्जा विभागातील तीन कंपन्यांसमोरील थकबाकी व कर्जाबाबत नुकतेच बैठक झाली. राज्य अंधारात जाण्यापासून वाचवण्यासाठी तातडीने उपाय करावेत, असे मत बैठकीत सर्वांनीच व्यक्त केले. या संकटावर तोडगा काढण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. बैठकीत महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील महावितरण कंपनीची थकबाकी व पुनर्रचना करण्याबाबत चर्चा झाली. 

राज्यात महावितरणसमोर सध्या ७३ हजार ८७९ कोटी रुपये थकबाकी आहे. कृषिपंप ग्राहकांकडे ४९ हजार ५७५ कोटींची थकबाकी आहे. विविध ग्राहक वर्गवारीचा विचार केल्यास सर्वाधिक थकबाकी कृषी ग्राहकांकडेच आहे. त्यांच्याकडून वसुलीचे प्रमाण केवळ ३.१ टक्केच आहे. राज्यातील पथदिवे ग्राहकांकडे चालू आर्थिक वर्षात ६ हजार १९९ कोटींची थकबाकी आहे. वसुलीची टक्केवारी २२.८ आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे चालू वित्तीय वर्षातील थकबाकी २२५८ कोटी असून वसुलीचे प्रमाण ६७.१ टक्के एवढे आहे.

या तुलनेत जिल्ह्याचा विचार केल्यास कृषी ग्राहकांकडे सर्वाधिक १९० कोटींची थकबाकी असून, त्यानंतर पथदिवे थकबाकी १०६ कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर घरगुती ग्राहकांकडे ६९ कोटींची थकबाकी आहे. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी थोडीसी कठोर भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास सुरवात केली आहे. परंतु संबंधित ठिकाणी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 


इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...