कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत  ८० हजार शेतकऱ्यांचा सहभाग 

कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठीच्या योजनेत जिल्ह्यातील ८० हजार १६६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावेत तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणच्या थकबाकीमुक्तीत  ८० हजार शेतकऱ्यांचा सहभाग  In arrears of MSEDCL 80,000 farmers participate
महावितरणच्या थकबाकीमुक्तीत  ८० हजार शेतकऱ्यांचा सहभाग  In arrears of MSEDCL 80,000 farmers participate

कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठीच्या योजनेत जिल्ह्यातील ८० हजार १६६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावेत तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. 

८२ कोटी ३ लाख रुपयांचा भरणा  कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन या नंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० हजार १६६ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ११४ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण ९७ कोटी ३ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ५६ हजार ७६२ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ८२ कोटी ३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ६१ कोटी ७६ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे. 

कोल्हापुरातील स्थिती  कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ५९४ शेतकऱ्यांकडे एकूण ४७९ कोटी ४४ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ३९९ कोटी ८३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी १९९ कोटी ९१ लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com