बागेतील संत्रा फळे पळविणाऱ्या टोळीला अटक

बागेतील संत्रा फळे पळविणाऱ्या टोळीला अटक
बागेतील संत्रा फळे पळविणाऱ्या टोळीला अटक

अमरावती ः संत्रापट्ट्यातील गावात बागेत शिरत संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून फळे नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. 

धामणगाव तालुक्‍यातील मंगरुळ दस्तगीर, पिंपळखुटा तसेच जिल्ह्याच्या इतर भागांतही संत्रा व मोसंबी बागेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. संततधार पावसामुळे तर यापूर्वी अति उष्ण तापमानामुळे फळगळीचा सामना करणाऱ्या बागायतदारांची बागेतील फळ चोरीच्या घटनांनी आणखीच चिंता वाढली होती. पिंपळखुटा येथे मोठ्या प्रमाणात मोसंबी चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होती. चौकशीत लालखडी येथील अब्दुल कादर याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत इरफान शाह महम्मद शाह, फारुक अली सादीक अली, सय्यद वकील ऊर्फ अकिल सय्यद अब्दुल, रहेमान शाह अयुब शाह, सलीम शाह महम्मद शाह हे साथीदार असल्याची कबुली दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एमएच ०४ ईएल-९४७० या क्रमांकाचे मालवाहू वाहन जप्त केले. 

या टोळीतील गोपाल विठ्ठल चव्हाण, रहमान शाह अयुब शाह, सलीम शाह महम्मद शाह हे तिघे पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलिस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक नरेंद्र पेंदोरे, उपनिरीक्षक भारत लसंते, मूलचंद भांबुरकर, सुनील तिडके, सचिन मिश्रा, संदीप लेकुरवाळे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com