Agriculture news in Marathi, Arresting a gang of theft orange fruits in the garden | Page 2 ||| Agrowon

बागेतील संत्रा फळे पळविणाऱ्या टोळीला अटक
सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अमरावती ः संत्रापट्ट्यातील गावात बागेत शिरत संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून फळे नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. 

अमरावती ः संत्रापट्ट्यातील गावात बागेत शिरत संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून फळे नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. 

धामणगाव तालुक्‍यातील मंगरुळ दस्तगीर, पिंपळखुटा तसेच जिल्ह्याच्या इतर भागांतही संत्रा व मोसंबी बागेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. संततधार पावसामुळे तर यापूर्वी अति उष्ण तापमानामुळे फळगळीचा सामना करणाऱ्या बागायतदारांची बागेतील फळ चोरीच्या घटनांनी आणखीच चिंता वाढली होती. पिंपळखुटा येथे मोठ्या प्रमाणात मोसंबी चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होती. चौकशीत लालखडी येथील अब्दुल कादर याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत इरफान शाह महम्मद शाह, फारुक अली सादीक अली, सय्यद वकील ऊर्फ अकिल सय्यद अब्दुल, रहेमान शाह अयुब शाह, सलीम शाह महम्मद शाह हे साथीदार असल्याची कबुली दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एमएच ०४ ईएल-९४७० या क्रमांकाचे मालवाहू वाहन जप्त केले. 

या टोळीतील गोपाल विठ्ठल चव्हाण, रहमान शाह अयुब शाह, सलीम शाह महम्मद शाह हे तिघे पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलिस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक नरेंद्र पेंदोरे, उपनिरीक्षक भारत लसंते, मूलचंद भांबुरकर, सुनील तिडके, सचिन मिश्रा, संदीप लेकुरवाळे यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
ग्रामपंचायत केंद्रचालकांचे मानधन...पुणे : राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमधील...
मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज...ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे...
ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍...महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब...
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा...अकोला  ः खरीप हंगामात राबविल्या जात असलेल्या...
ताप, अंगदुखीवर चुंच उपयुक्त स्थानिक नाव      चुंच,...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत...जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा...
समुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः...नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी...
वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जा...कारचा एक्झॉस्ट पाइप, औद्योगिक प्रक्रियामध्ये...
पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका सुरूचपुणे : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत...
नाशिक जिल्ह्यातील वागदर्डी धरण चार...नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे...