agriculture news in Marathi arrival of Custard apple and pomegranate Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीत सीताफळ, डाळिंबाची आवक घटली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सध्याच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील कृषिक्षेत्राला बसत आहे. डाळिंब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. 

मुंबई: सध्याच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील कृषिक्षेत्राला बसत आहे. डाळिंब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे डाळिंबावर काळे डाग पडून फळं खराब होऊ लागली आहेत. तर सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे.

डाळिंब वर्षभर मिळत असले, तरी पावसाळ्यात त्यांचे उत्पादन अधिक चांगले असते. रोपांना चांगले पाणी मिळत असल्याने अगदी रसदार आणि टपोऱ्या दाण्यांची डाळिंबे या काळात पाहायला आणि खायला मिळतात. या काळात त्यांचे दरही कमी असतात. मात्र आता सलग पडणाऱ्या पावसाने मध्येच विश्रांती घेत पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे शेतात तयार झालेल्या डाळिंबावर पाणी पडून त्यावर काळे डाग पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे फळं खराब होत आहेत. डाग लागलेली फळे खरेदी करण्यास कुणी तयार होत नाही. आता बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. 

घाऊक बाजारात जेजुरी, नगर, सांगोला, सासवड येथून डाळिंबाची आवक होत असते. आता सासवडवरून आवक सुरू आहे. ही आवक मागच्या महिन्यापेक्षा कमी आहे. ५० ते १०० रुपये किलो असणारे डाळिंबाचे दर घाऊक बाजारात ५० ते १५० रुपये किलोवर गेले आहेत.

हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. घाऊक बाजारात सध्या सासवड, शिरुरमधून सीताफळांची आवक होत आहे. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. आकारानुसार सीताफळ ४० ते १०० रुपये किलो घाऊक बाजारात आहेत. त्यातही आकाराने मोठे असलेल्या गोल्डन सीताफळाची आवक अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे सीताफळाचा हा हंगाम मंदीतच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मागणी पूर्ण होत नाही
आधीच बाजारात खरेदीदार कमी आहेत आता आवकही कमी होत आहे. आधीच कमी असणाऱ्या ग्राहकांची मागणी पूर्ण करता येईल इतका मालही बाजारात येत नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी चांगली फळे लागली असून चांगला माल बाजारात पाठवता येईल, असे निरोप अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठवले होते, मात्र मध्येच आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट कायम असल्याचे व्यापारी सांगत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...