पावसामुळे पुणे बाजारसमितीत झेंडू, शेवंती फुलांची आवक घटली

मी आज ४०० किलो शेवंतीची फुले विक्रीसाठी आणली होती. या वेळी किलोला ८० ते १३० रुपये दर मिळाला. - विनायक शितोळे, शेतकरी, यवत, जि. पुणे.
पुणे बाजारसमितीत शेवंती फुलांची झालेली आवक
पुणे बाजारसमितीत शेवंती फुलांची झालेली आवक

पुणे  ः सततच्या पावसाचा फटका फुलोत्पादनाला बसला आहे. परिणामी, दिवाळीसाठी विशेष मागणी असलेल्या झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची आवक घटली असली, तरी चांगल्या दर्जाच्या फुलांना चांगले दर मिळाले. मात्र चांगल्या दर्जाच्या फुलांची आवक कमी होती. पुणे बाजार समितीतील फुलबाजारात शनिवारी (ता.२६) झेंडूला दर्जानुसार १० ते १०० रुपये; तर शेवंतीला ५० ते १२० रुपये प्रतिकिलो दर होता.

फुलांना मागणी असलेल्या विविध सणांमध्ये दिवाळीचा सण असतो. याकाळात फुलांना चांगले दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र यंदा सततच्या पावसामुळे फुलांच्या उत्पादनाबरोबर दर्जादेखील घसरलेला आहे. बाजारात आवक झालेल्या फुलांमध्ये २५ ते ३० टक्के फुले भिजलेली होती. त्यामुळे भिजलेल्या फुलांना मागणी आणि दर नसल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. मात्र चांगल्या फुलांना मागणी आणि दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या प्रतिच्या झेंडूला १०० रुपये; तर शेवंतीला १२० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. 

रविवारी (ता. २७) लक्ष्मीपूजन आणि सोमवारी (ता.२८) दिवाळी पाडव्यानिमित्त फुलांना मागणी राहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. शनिवारी दुपारपर्यंत फुलांची आवक सुरूच होती. रविवारीदेखील मोठ्या प्रमाणावर आवकेची शक्यता असून त्यामध्ये चांगल्या दर्जाची फुले किती असतील यावर बाजारभाव अवलंबून असतील, असेही भोसले यांनी सांगितले. 

विविध फुलांचे दर (रुपये, प्रतिकिलो) ः झेंडू २०-१००, बिजली - २०-६०, शेवंती ५०-१२०, गुलछडी १५०-३००, सुट्टा ॲस्टर ६०-१५०, लिलीबंडल ३०-४०.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com