खानदेशात मुगाची आवक रखडली

खानदेशात मुगाची आवक रखडली
खानदेशात मुगाची आवक रखडली

जळगाव  ः खानदेशात जळगाव, चोपडा बाजारात मागील आठवड्यात मुगाला कमाल ६४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. तर किमान दर ५००० रुपयांपर्यंत मिळाले आहेत. जळगाव वगळता इतर बाजार समित्यांमध्ये आवक कमी आहे.  जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात प्रतिदिन ६०० क्विंटल सरासरी आवक झाली. चोपडा व अमळनेर येथील बाजारातही सरासरी प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंत आवक झाली. धुळ्यातील दोंडाईचा, धुळे व शिरपूर येथील बाजारातही रखडत आवक सुरू आहे. १५ सप्टेंबरनंतर आवक वाढू शकते, असे सांगितले जात आहे. कारण सध्या अनेक भागात काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. मूग लागवडीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार आदी भाग प्रसिद्ध आहे.   जळगाव येथील बाजारात स्थानिक क्षेत्रातून आवक फारशी नाही. औरंगाबाद, सिल्लोड भागातून जळगावच्या बाजारात तेथील मोठे खरेदीदार मूग पाठवीत आहेत. तर शेतकऱ्यांकडूनही कमी अधिक आवक सुरू आहे. चोपडा, अमळनेर येथे रोज लिलाव होत आहेत. तेथे लिलावात दर्जेदार मुगाला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकरी या बाजारांमध्ये मूग पाठवीत आहेत. धुळ्यातील दोंडाईचा, नंदुरबार येथील बाजारातही रोज लिलावात दर जाहीर होत असल्याने या बाजारांना शेतकरी पसंती देत आहेत. सोमवारी (ता. ९) पावसाळी वातावरण असल्याने फारशी आवक चोपडा, अमळनेर येथे झाली नाही. तर जळगावातही शेतकऱ्यांकडून मुगाची बाजारात फारशी पाठवणूक झाली नाही, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com