Agriculture news in marathi; The arrival of mugs in Khandesh was kept | Agrowon

खानदेशात मुगाची आवक रखडली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात जळगाव, चोपडा बाजारात मागील आठवड्यात मुगाला कमाल ६४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. तर किमान दर ५००० रुपयांपर्यंत मिळाले आहेत. जळगाव वगळता इतर बाजार समित्यांमध्ये आवक कमी आहे. 

जळगाव  ः खानदेशात जळगाव, चोपडा बाजारात मागील आठवड्यात मुगाला कमाल ६४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. तर किमान दर ५००० रुपयांपर्यंत मिळाले आहेत. जळगाव वगळता इतर बाजार समित्यांमध्ये आवक कमी आहे. 

जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात प्रतिदिन ६०० क्विंटल सरासरी आवक झाली. चोपडा व अमळनेर येथील बाजारातही सरासरी प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंत आवक झाली. धुळ्यातील दोंडाईचा, धुळे व शिरपूर येथील बाजारातही रखडत आवक सुरू आहे. १५ सप्टेंबरनंतर आवक वाढू शकते, असे सांगितले जात आहे. कारण सध्या अनेक भागात काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. मूग लागवडीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार आदी भाग प्रसिद्ध आहे.  

जळगाव येथील बाजारात स्थानिक क्षेत्रातून आवक फारशी नाही. औरंगाबाद, सिल्लोड भागातून जळगावच्या बाजारात तेथील मोठे खरेदीदार मूग पाठवीत आहेत. तर शेतकऱ्यांकडूनही कमी अधिक आवक सुरू आहे. चोपडा, अमळनेर येथे रोज लिलाव होत आहेत. तेथे लिलावात दर्जेदार मुगाला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकरी या बाजारांमध्ये मूग पाठवीत आहेत. धुळ्यातील दोंडाईचा, नंदुरबार येथील बाजारातही रोज लिलावात दर जाहीर होत असल्याने या बाजारांना शेतकरी पसंती देत आहेत. सोमवारी (ता. ९) पावसाळी वातावरण असल्याने फारशी आवक चोपडा, अमळनेर येथे झाली नाही. तर जळगावातही शेतकऱ्यांकडून मुगाची बाजारात फारशी पाठवणूक झाली नाही, अशी माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...