Agriculture news in Marathi, The arrival of new soybeans in the domestic market increased | Agrowon

कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची आवक कळमणा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात होत आहे. गुरुवारी (ता. १७) ४३३१ क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे व्यवहार २८०० ते ३४३० रुपये क्‍विंटल दरम्यान होत आहेत. 

नागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची आवक कळमणा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात होत आहे. गुरुवारी (ता. १७) ४३३१ क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे व्यवहार २८०० ते ३४३० रुपये क्‍विंटल दरम्यान होत आहेत. 

बाजारात सोयाबीन सोबतच बटाटा आवक वाढती आहे. लगतच्या मध्यप्रदेशात बटाटा लागवड होते. विक्रीकरिता कळमणा बाजार समितीचा पर्याय या भागातील शेतकऱ्यांसाठी असल्याने ते येथेच शेतमाल आणतात. बटाट्याची ६३१३ क्‍विंटलची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात बटाटा आवक ४२९६ क्‍विंटलची होती. ८०० ते १३०० रुपये क्‍विंटलचे दर असताना आता काहीशी त्यात वाढ नोंदविली गेली. त्यानुसार ९०० ते १४०० रुपयांवर बटाट्याचे दर गेले आहेत. गव्हाचे दर २००० ते २०८६ रुपये क्‍विंटलचे होते. ४०० क्‍विंटल गव्हाची आवक बाजारात झाली. 

हरभऱ्याची गेल्या आठवड्यात ३८१ क्‍विंटलची आवक होती. या आठवड्यात हरभरा आवक १०५ क्‍विंटलवर पोचल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. हरभऱ्याचे दर ३५०० ते ४३७१ रुपये क्‍विंटलचे आहेत. बाजारात तुरीची या आठवड्यात अवघी तीन क्‍विंटलची आवक झाली. गेल्या आठवड्यात ही आवक ३८ क्‍विंटल होती. ५००० ते ५२०० रुपये क्‍विंटलने तुरीचे व्यवहार होत आहेत. 

मुगाची शुक्रवारी (ता. ११) एकच दिवस आवकेची नोंद आहे. बाजारात ८० क्‍विंटल भुईमूग शेंगाची आवक झाली. ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलचा शेंगाचा दर होता. सद्य:स्थितीत भुईमूग शेंगाचे दर ५००० ते ६००० रुपयांवर पोचले आहेत. टोमॅटोची आवक ११० क्‍विंटलची तर दर २००० ते २५०० रुपये होते. भेंडीची आवक १५० क्‍विंटलची तर दर १५०० ते २००० रुपये क्‍विंटल मिळाले. गावर शेंगाचे दरात काहीशी तेजी अनुभवली गेली. ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलचे दर गवार शेंगांना मिळाले. १२० क्‍विंटलची आवक झाली. 

हिरवी मिरची देखील बाजारात येत असून आवक १३० क्‍विंटलची आहे. १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलची आवक हिरव्या मिरचीची होत आहे. मेथीची देखील आवक बाजारात होत असून ती ८० क्‍विंटलच्या घरात आहे. मेथीचे दर ३००० ते ५००० रुपये क्‍विंटलचे आहेत.

इतर बाजारभाव बातम्या
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांग्याच्या दरात तेजीसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये...सोलापुरात सर्वाधिक ६००० रुपये सोलापूर...
नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात कोथिंबिरीस प्रतिशेकडा २००० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या भावात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये...सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची ३०५६...
परभणीत मेथीची पेंडी ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सीताफळ ५०० ते ४००० रुपये...पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो पुणे...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...