बार्शीत तुरीची आवक वाढली

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात मंगळवारपर्यंत (ता.१९ जानेवारी) एकूण आवक एक लाख पंधरा हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. दररोज सर्वसाधारण पाच हजार क्विंटल तुरीची आवक होते.
बार्शीत तुरीची आवक वाढली The arrival of trumpets increased in Barshit
बार्शीत तुरीची आवक वाढली The arrival of trumpets increased in Barshit

बार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात मंगळवारपर्यंत (ता.१९ जानेवारी) एकूण आवक एक लाख पंधरा हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. दररोज सर्वसाधारण पाच हजार क्विंटल तुरीची आवक होते.

बार्शी तालुक्यासह माढा, भूम, परांडा, वाशी, बीड, मोहोळ, करमाळा, माजलगाव, उस्मानाबाद, तुळजापूर, कर्नाटक येथून तूर विक्रीसाठी येते. पांढऱ्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, लाल, काळी या तुरीची आवक कमी प्रमाणात आहे.

बार्शी परिसरात जवळपास १५ ते २० दाळ मिल असल्याने व्यापारी येथून तूर खरेदी करतात. मद्रास, बेंगलोर आदी दक्षिण भारतातील शहरांतून व्यापारी तूर खरेदीसाठी बार्शीत येतात. मागील वर्षा पेक्षा या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाला आहे. या वर्षी तुरीचे उत्पन्नही चांगले झाले आहे.

प्रतिक्रिया आवक चांगली आहे. मालाला गिऱ्हाईक आहे. रोजच्या रोज व्यवहार पूर्ण होतात. बाजार स्थिर आहे. पांढरी तूर चवीला चांगली असल्याने मागणी जास्त प्रमाणात असते. दक्षिण भारतातील व्यापारी बार्शीतून तूर खरेदी करतात.  -दिलीप शांतिलाल गांधी, व्यापारी, मार्केट यार्ड बार्शी. 

बाजार समितीकडून सहकार्य केले जाते.आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार व्यवस्थित चालू आहेत. तमिळनाडू, चेनई, गुजरात या राज्यांत तूर विक्री होते. स्थानिक दाळ मिल व्यापारीही तूर खरेदी करतात.  -रणवीर राजेंद्र राऊत, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी

भाव क्विंटलमध्ये (१९ जानेवारीपर्यंत)  तूर प्रकार    किमान    कमाल    सर्वसाधारण पांढरी     ५२००    ५९००    ५५००  लाल     ३६००    ५५००    ४९००  काळी     ५०००    ५४२५    ५२५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com