Agriculture news in marathi The arrival of trumpets increased in Barshit | Agrowon

बार्शीत तुरीची आवक वाढली

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात मंगळवारपर्यंत (ता.१९ जानेवारी) एकूण आवक एक लाख पंधरा हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. दररोज सर्वसाधारण पाच हजार क्विंटल तुरीची आवक होते.

बार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात मंगळवारपर्यंत (ता.१९ जानेवारी) एकूण आवक एक लाख पंधरा हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. दररोज सर्वसाधारण पाच हजार क्विंटल तुरीची आवक होते.

बार्शी तालुक्यासह माढा, भूम, परांडा, वाशी, बीड, मोहोळ, करमाळा, माजलगाव, उस्मानाबाद, तुळजापूर, कर्नाटक येथून तूर विक्रीसाठी येते. पांढऱ्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, लाल, काळी या तुरीची आवक कमी प्रमाणात आहे.

बार्शी परिसरात जवळपास १५ ते २० दाळ मिल असल्याने व्यापारी येथून तूर खरेदी करतात. मद्रास, बेंगलोर आदी दक्षिण भारतातील शहरांतून व्यापारी तूर खरेदीसाठी बार्शीत येतात. मागील वर्षा पेक्षा या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाला आहे. या वर्षी तुरीचे उत्पन्नही चांगले झाले आहे.

प्रतिक्रिया
आवक चांगली आहे. मालाला गिऱ्हाईक आहे. रोजच्या रोज व्यवहार पूर्ण होतात. बाजार स्थिर आहे. पांढरी तूर चवीला चांगली असल्याने मागणी जास्त प्रमाणात असते. दक्षिण भारतातील व्यापारी बार्शीतून तूर खरेदी करतात. 
-दिलीप शांतिलाल गांधी, व्यापारी, मार्केट यार्ड बार्शी. 

बाजार समितीकडून सहकार्य केले जाते.आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार व्यवस्थित चालू आहेत. तमिळनाडू, चेनई, गुजरात या राज्यांत तूर विक्री होते. स्थानिक दाळ मिल व्यापारीही तूर खरेदी करतात. 
-रणवीर राजेंद्र राऊत, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी

भाव क्विंटलमध्ये (१९ जानेवारीपर्यंत) 
तूर प्रकार    किमान    कमाल    सर्वसाधारण
पांढरी     ५२००    ५९००    ५५०० 
लाल     ३६००    ५५००    ४९०० 
काळी     ५०००    ५४२५    ५२५०


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...