पुणे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली; दर स्थिर

पुणे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली; दर स्थिर
पुणे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली; दर स्थिर

पुणे : आवक वाढूनही मागणी कमी राहिल्याने सर्व पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर राहिले. कमी पाणी आणि लवकर पीक हातात येत असल्यामुळे पालेभाज्यांच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याचे दिसून आले. त्यामुळे मेथी आणि कोथिंबिरीची मिळून सुमारे सव्वातीन लाख जुड्या एवढी आवक झाली. आवक आणि मागणीच्या तुलनेत कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटो यांचे दहा किलोचे दर घाऊक बाजारात शंभर रुपयांच्या आतमध्येच राहिले. परराज्यांतून मटारची आवक वाढू लागली आहे.

गुलटेकडी येथील भाजीपाला बाजारात परराज्य आणि पुणे विभागातून मिळून सुमारे १४० ते १५० गाड्या मिळून आवक झाली. त्यामध्ये मध्य प्रदेश येथून १५ ते १६ ट्रक मटार, राज्यस्थान येथून ९ ते १० ट्रक गाजर, बंगलोर येथून ३ टेम्पो आले, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, गुजरात व कर्नाटक येथून ३ ते ४ ट्रक कोबी आणि १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरजी एवढी आवक झाली.

पुणे विभागातून ८ ते १० टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो फ्लॉवर, १० ते १२ टेम्पो सिमला मिरची, ४० ते ५० पोती भुईमूग शेंग, शंभर पोती गावरान गाजर, ४ ते ५ हजार पेटी टोमॅटो, १० ते १२ टेम्पो भेंडी, १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळा, ७ ते ८ टेम्पो वांगी, ४ ते ५ टेम्पो हिरवी मिरची आणि ५ ते ६ टेम्पो पावटा एवढी आवक झाली.

इंदौर आणि आग्रा येथून ७० ट्रक बटाट्याची आवक झाली. आग्राच्या बटाट्याला मागणी कमी राहिल्याच्या त्याच्या दरात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली, तर जुन्या कांद्याची आणि नवीन कांद्याची मिळून सुमारे १०० ट्रक एवढी आवक झाली. कांद्याचे दर मात्र स्थिर राहिले. सातारी आल्याची ११०० ते १२०० गोणी, तर मध्य प्रदेश आणि गुजरात येथून पाच हजार गोणी मिळून आल्याची आवक झाली.

कोथिंबिरीची सुमारे सव्वादोन लाख जुडी आवक झाली. मेथीची आवक या आठवड्यात वाढली असून आज सुमारे एक लाख जुड्या एवढी आवक झाली. सोलापूर आणि नगर येथून तीन हजार गोणी लिबांची आवक झाली असून दर टिकून राहिले.

फळबाजार थंडी वाढल्यामुळे फळबाजारात या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर सर्वच फळांची मोठी आवक झाली. मात्र, त्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कलिंगडाच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी, खरबूज आणि पपईच्या दरात दोन ते पाच रुपयांनी किलोमागे घट झाली. बारामती, नगर आणि इंदापूर येथून आवक वाढल्यामुळे डाळिंबाच्या दरात जवळपास वीस टक्‍क्‍यांनी घट झाली. चिकूची आवक वाढल्याने कॅरेटमागे १०० ते ३०० रुपयांनी जवळपास घट झाली. द्राक्षांचीदेखील हीच परिस्थिती असून, मागणी नसल्यामुळे कॅरेटच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे.

पुणे विभागातून कलिंगडाची सुमारे २० ते २५ टेम्पो, खरबुजाची १० ते १२ टेम्पो आणि पपईची १५ ते २० टेम्पो एवढी आवक झाली. थंडीमुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी कमी राहिली. त्यामुळे दरात घट झाली, तर मागणीपेक्षा अधिक आवक झाल्याने पपईची दर घसरले. औरंगाबाद विभागातून शंभर टन मोसंबीची, तर नगर जिल्ह्यातून संत्र्यांची १० टन एवढी आवक झाली. दोन्हीचे दर स्थिर राहिले. केरळ येथून दहा गाडी अननस, गुजरात येथून २ हजार कॅरेट चिकूची आवक झाली. पेरूची ५०० ते ८०० बॉक्‍स एवढी आवक झाली असून दरात शंभर रुपयांनी घट झाली. आकारने मोठ्या असलेल्या आणि रायपूरचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरूची १०० कॅरेट आवक झाली. फलटण, बारामती आणि इंदापूर येथून द्राक्षांची ५ ते ६ टन एवढी आवक झाली. अवकाळी पावसामुळे ही आवक वाढल्याने दरात घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काश्‍मीर येथून सफरचंदाची सुमारे पाच ते सहा हजार पेटी एवढी आवक झाली.

फुलबाजार थंडीमुळे तापमानात घट होऊ लागली आहे. त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर जाणवू लागला आहे. परिणामी फुलबाजारात फुलांची आवक घटली. रविवारी फुलांची आवक साधारणच राहिली. मागणी कमी राहिल्याने गुलछडी व झेंडू वगळता अन्य सर्व फुलांचे दर स्थिर राहिले. गुलछडी आणि झेंडूच्या भागात मात्र ५ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे. झेंडूचा २० ते ६० रुपये आणि गुलछडीचा प्रतिकिलोचा भाव पाच ते २० रुपये असा राहिला.

मासळी बाजार थंडी पडायला सुरवात झाल्याने मासळीची आवक कमी होऊ लागली. त्यामुळे खोल समुद्रातील मासळीच्या दरात १० ते २० टक्‍क्‍यांनी आणि नदीतील मासळीच्या दरात ५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली, तर इंग्लिश अंड्यांच्या शेकड्याच्या दरात ३० रुपयांनी घट झाली आहे. मटण आणि चिकनचे दर मागील आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची ३०० ते ४०० किलो, नदीतील मासाळीची ८०० ते ९०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० ते १२ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

मटणाचे दर : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकनचे दर : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४१० डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com