Agriculture news in Marathi Arrived in Pune, improvement in tomato prices | Page 3 ||| Agrowon

पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

सततच्या पावसामुळे काही प्रमाणात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला होता. आवक घटल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २५) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. सततच्या पावसामुळे काही प्रमाणात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला होता. आवक घटल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.

आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी २ टेम्पो, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून घेवडा २ तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती आवक झाली होती. तर भेंडी, गवार आणि कोबी प्रत्येकी सुमारे ७ गोणी. फ्लॉवर आणि सिमला मिरची प्रत्येकी १० टेम्पो, स्थानिक मटार १ हजार गोणी, तांबडा भोपळा सुमारे १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, गावरान कैरी २ टेम्पो, तर कांदा ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १५०-२००, बटाटा : १००-१५०, लसूण : ३००-१०००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : १५०-२००, गवार : २००-३००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २००-३५०, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१५०, पापडी : १००-१५०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १००-१४०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १००-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-३००, गाजर : २००- २५० वालवर : २००-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ३००-३५०, मटार - ४५०-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, गावरान - १००-१५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे दीड लाख, तर मेथीच्या ८० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ५००-१२००, मेथी -३००-१०००, शेपू २००-५००, कांदापात ३००-७००, चाकवत -३००-७००, करडई ४००-५००, पुदिना २००-३००, अंबाडी - ८००-१०००, मुळे - ७००-१०००, राजगिरा - ३००-५००, चुका ३००-६००, चवळई - २००-५००, पालक ५००-६००. 

फळबाजारात रविवारी (ता. २५) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ४० टन, मोसंबी ३० टन, संत्रा १ टन, पपई ८ टेम्पो, चिकू आणि पेरूची सुमारे ५०० बॉक्स आणि क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड २ टेम्पो आणि खरबूज १ टेम्पो आवक झाली होती. आवक घटल्याने कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ५०-१६०, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, (४ डझन) : ३० -८०, संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : १५-२० खरबूज : २०-२५ पपई : १८-२५, चिकू (१० किलो) ८०-४००, पेरू (२० किलो) : १५०-३५०. 

फुलबाजार 
प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १६-४०, गुलछडी : ५०-१००, बिजली : २०-४०, कापरी : २०-५०, शेवंती : ३०-५०, मोगरा : २५०-३००, ॲस्टर : १२-२०, गुलाब गड्डी (बारा नगांचे दर) : १०-३०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-७०, लिली बंडल (५० काडी) : ६-१०, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०.

मटण-मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली 
होती. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 
पापलेट : कापरी : १४०० मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान ८००-१०००, भिला : ७००, हलवा : ६५०-८००, सुरमई : ७००-८००, रावस : लहान ८५०-९५०, मोठा : १२००, घोळ : १०००, करली : ४४०, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ८००-९००, काळी ३२० ओले बोंबील : २००-२८०. 

कोळंबी 
लहान २८०, मोठी ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : ८००-१०००, मोरी : २८०-३६०, राणीमासा : २००, खेकडे २४०, चिंबोऱ्या ५५०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे -४००-४४०, खापी - २८०-३६०, नगली ४००-६००, तांबोशी ४००-४८०, लेपा २००- २८०, बांगडा २४० - ३६०, शेवटे १००-२८०, पेडवी १२०, बेळुंजी २००, तिसऱ्या २४०, खुबे १००-१४०, तारली १६०. 

नदीची मासळी 
रहू : १४०- १६०, कतला : १६०, मरळ : ४४०-४८०, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : २४०, वाम : ५५०-६००. 

चिकन 
चिकन : २४०, लेगपीस : २८० जिवंत कोंबडी : १९०, बोनलेस : ३४०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ९१० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ५२५ डझन : ७२ प्रतिनग : ६. 

मटण 
बोकडाचे : ७०० बोल्हाईचे : ७०० खिमा : ७००, कलेजी : ७४०.


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...