बहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळ

वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात पिके तसेच इतर वनस्पती, झाडाझुडपांचे नुकसान करते. समूह अवस्थेत ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सध्याच्या परिस्थितीत राजस्थान व गुजरात तसेच महाराष्ट्रातील विदर्भाच्या पट्यात या किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे.
Desert locusts
Desert locusts

वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात पिके तसेच इतर वनस्पती, झाडाझुडपांचे नुकसान करते. समूह अवस्थेत ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सध्याच्या परिस्थितीत राजस्थान व गुजरात तसेच महाराष्ट्रातील विदर्भाच्या पट्यात या किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. किडीचा जीवनक्रम अंडी

  • कीड आपली अंडी ओल्या रेतीमध्ये समूहामध्ये शेंगेसारख्या लांबुळक्‍या आवरणामध्ये घालते.
  • एक मादी साधारणतः १५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमान, आर्द्रतेवर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे अंडी १० ते १२ दिवसात उबतात.
  • पिल्ले

  • पिल्लाच्या अवस्था या किडीच्या अवस्थेवरून कमी जास्त होतात, जेव्हा कीड एकट्या अवस्थेत असते, तेव्हा पिल्लाच्या पाच अवस्था आढळतात. समूह अवस्थेत या किडीच्या सहा पिल्ले अवस्था आढळून येतात.
  • तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्यास पिल्ले अवस्था २२ दिवसांत पूर्ण होते. कमी तापमानात २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान पिल्ले अवस्था ७० दिवसात पूर्ण होते.
  • प्रौढ 

  • पाचव्या अवस्थेतील पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. सुरुवातीच्या काळात त्याचे पंखे नाजूक असल्याने काही काळ उडू शकत नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी अपरिपक्व प्रौढ उडू शकतात. हीच अवस्था जास्त लांबपर्यंत उडून नुकसानकारक असते. ही अवस्था साधारणपणे १५ ते २० दिवसांची असते. थंड वातावरणात ही अवस्था आठ महिन्यापर्यंत सुध्दा तग धरू शकते.
  • सर्व साधारणपणे चार आठवड्यानंतर प्रौढ प्रजनन करण्यासाठी सक्षम होतात. नर हे मादीपूर्वी प्रजननासाठी सक्षम होतात. मादी टोळ समागमानंतर दोन दिवसांनी अंडी घालते.
  • खाद्याच्या शोधात हे प्रौढ हवेच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जातात. एकट्या अवस्थेतील प्रौढ दिवसा फक्त काही तास उडू शकतात. समूह अवस्थेतील प्रौढ हे दिवस-रात्र उडू शकतात. दूरच्या ठिकाणावर जाऊन नुकसान करतात.
  • तरूण व अपरिपक्व समूह अवस्थेतील प्रौढ हे गुलाबी रंगाचे असतात. थंड वातावरणात ते लाल व करड्या रंगाचे असतात. प्रौढ, पक्व व समूह अवस्थेतील प्रौढ हे चमकदार पिवळ्या रंगाचे असतात.
  • व्यवस्थापन

  • किडीने आपल्या शेतात प्रवेश करू नये याकरिता शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदावेत.
  • थाळ्या वाजवून मोठ्याने आवाज करावा,जेणेकरून कीड शेतापासून दूर राहील.
  • नियंत्रणाचे उपाय निंबोळी आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्‍टीन (१५०० पीपीएम) ४५ मिलि प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    रासायनिक कीडनाशक ( फवारणी - प्रति १० लिटर पाणी)

  • क्‍लोरपायरिफॉस (२५ टक्के प्रवाही) - २४ मि.लि. किंवा
  • डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) - १० मि.लि. किंवा
  • लॅंबडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) - १० मि.लि. किंवा
  • फिप्रोनिल (५ एस.सी.) २.५ मि.लि.,
  • ( संदर्भ- केंद्रिय कृषी मंत्रालय, भारत सरकार,नवी दिल्ली यांचे परीपत्रक)

    संपर्क - डॉ. ए.के.सदावर्ते , ९६५७७२५६९७ (कीटकशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com