ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाण

ॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड देशभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते. लाल, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध याची फुले ही दांडे किंवा सुट्या स्वरूपातही वापरली जातात.
Aster flowers
Aster flowers

ॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड देशभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते. लाल, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध याची फुले ही दांडे किंवा सुट्या स्वरूपातही वापरली जातात. आकर्षक फुलांना विविध रंगामुळे सजावटीकरीता सण, लग्न समारंभ विशेष मागणी असते. जमीन 

  • मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • काळी कसदार भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते.
  • हलक्या जमिनीत पिकांची वाढ खुंटते.
  • हवामान  हे पीक वर्षभर घेता येत असल्यामुळे खरीपाकरीता जून-जुलै, रब्बी हंगामाकरिता ऑक्टोबर -नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी -मार्च मध्ये लागवड करावी. थंड हवामानात या फूल पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचा दर्जा उत्तम राहतो. म्हणून अधिक दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळविण्याकरिता बियाणांची लागवड ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. सुधारित जाती फुले गणेश व्हाइट, फुले व्हाइट, फुले व्हायोलेट, फुले पिंक रामकाठी, कामिनी, पुर्णिमा, शशांक, फुले ब्ल्यू. अभिवृद्धी  ॲस्टरची रोपे बियांपासून तयार करतात. एका वर्षापेक्षा जास्त जुन्या बियांची चांगली उगवण होत नाही. रोपवाटिका  ॲस्टरची रोपवाटिका तयार करण्यासाठी १ मीटर रुंदीचे व १५ ते २० सेंमी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. वाफ्यामध्ये ८ ते १० किलो चाळलेले शेणखत चांगले मिसळून घ्यावे. गादी वाफ्यावर १० सेंमी अंतरावर लागवड खुरप्याच्या साह्याने अर्धा सेंमी खोलीच्या ओळी तयार कराव्यात. चाळलेल्या बारीक शेणखताच्या थराने बी झाकावेत. त्यावर रोज सकाळ सायंकाळी झारीने पाणी द्यावे. बियाणांची उगवण होईपर्यंत गादीवाफे, गवत, पालापाचोळा याने झाकून ठेवावेत. ॲस्टरची रोपे साधारण २१ ते २५ दिवसांत तयार होतात. तयार झालेली रोपे वाफे वापसा अवस्थेत असतानाच काढावीत. साधारण हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे होते. लागवड पूर्व तयारी  लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा खोल नांगरट करावी. हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. लागवड  महाराष्ट्रातील जमिनी चांगल्या मध्यम ते भारी असल्यामुळे सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. ॲस्टरची लागवड ३० बाय ३० सेंमी अंतरावर करावी. रोपांची लागवड सायंकाळी ४ वाजल्यानंतर व भरपूर पाणी दिल्यानंतर करावी. म्हणजे रोपांची मर होणार नाही. आंतरमशागत लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी खुरपणी करावी. रासायनिक खते लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी नत्र, स्फुरद, पालाश १५०ः५०ः५० किलो प्रमाणात द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र कळ्या धरताना द्यावे. पाणी व्यवस्थापन ॲस्टर पिकाच्या मुळ्या जास्त खोल जमिनीत जातात. त्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वापसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. साधारण ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या येण्याच्या वेळेस पाण्याचा ताण बसणार नाही, याची दक्षता घ्यावी. व्यवस्थापन व काढणी  या पिकावर मावा, नागअळी, कळी पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी या किडी आणि मर, मुळ कुजवा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. लागवडीनंतर साधारणतः १० ते १२ आठवड्यांनी फुले तोडणीकरिता तयार होतात. सुटी फुले ही प्रामुख्याने हार, सजावटीसाठी वापरली जातात. फुलदाणी, गुच्छाकरिता दांड्यांची ॲस्टर फुले वापरली जातात. उत्पादन हेक्टरी ६ ते ८ मे. टन मिळते. संपर्क- डॉ. एस. एन. लोखंडे, ७३८७६७४३२१ डॉ. व्ही. जी. नागदेवते, ९४२१८००५९० डॉ. व्ही. एन. सिडाम, ९७६६५२९४३६ (कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com