agriculture news in marathi article regarding aster cultivation | Agrowon

ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाण

डॉ. एस. एन. लोखंडे, डॉ. व्ही. जी. नागदेवते, डॉ. व्ही. एन. सिडाम
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

ॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड देशभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते. लाल, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध याची फुले ही दांडे किंवा सुट्या स्वरूपातही वापरली जातात.

ॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड देशभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते. लाल, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध याची फुले ही दांडे किंवा सुट्या स्वरूपातही वापरली जातात. आकर्षक फुलांना विविध रंगामुळे सजावटीकरीता सण, लग्न समारंभ विशेष मागणी असते.

जमीन 

  • मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • काळी कसदार भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते.
  • हलक्या जमिनीत पिकांची वाढ खुंटते.

हवामान 
हे पीक वर्षभर घेता येत असल्यामुळे खरीपाकरीता जून-जुलै, रब्बी हंगामाकरिता ऑक्टोबर -नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी -मार्च मध्ये लागवड करावी. थंड हवामानात या फूल पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचा दर्जा उत्तम राहतो. म्हणून अधिक दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळविण्याकरिता बियाणांची लागवड ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी.

सुधारित जाती
फुले गणेश व्हाइट, फुले व्हाइट, फुले व्हायोलेट, फुले पिंक रामकाठी, कामिनी, पुर्णिमा, शशांक, फुले ब्ल्यू.

अभिवृद्धी 
ॲस्टरची रोपे बियांपासून तयार करतात. एका वर्षापेक्षा जास्त जुन्या बियांची चांगली उगवण होत नाही.

रोपवाटिका 
ॲस्टरची रोपवाटिका तयार करण्यासाठी १ मीटर रुंदीचे व १५ ते २० सेंमी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. वाफ्यामध्ये ८ ते १० किलो चाळलेले शेणखत चांगले मिसळून घ्यावे. गादी वाफ्यावर १० सेंमी अंतरावर लागवड खुरप्याच्या साह्याने अर्धा सेंमी खोलीच्या ओळी तयार कराव्यात. चाळलेल्या बारीक शेणखताच्या थराने बी झाकावेत. त्यावर रोज सकाळ सायंकाळी झारीने पाणी द्यावे. बियाणांची उगवण होईपर्यंत गादीवाफे, गवत, पालापाचोळा याने झाकून ठेवावेत. ॲस्टरची रोपे साधारण २१ ते २५ दिवसांत तयार होतात. तयार झालेली रोपे वाफे वापसा अवस्थेत असतानाच काढावीत. साधारण हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे होते.

लागवड पूर्व तयारी 
लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा खोल नांगरट करावी. हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.

लागवड 
महाराष्ट्रातील जमिनी चांगल्या मध्यम ते भारी असल्यामुळे सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. ॲस्टरची लागवड ३० बाय ३० सेंमी अंतरावर करावी. रोपांची लागवड सायंकाळी ४ वाजल्यानंतर व भरपूर पाणी दिल्यानंतर करावी. म्हणजे रोपांची मर होणार नाही.

आंतरमशागत
लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी खुरपणी करावी.

रासायनिक खते
लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी नत्र, स्फुरद, पालाश १५०ः५०ः५० किलो प्रमाणात द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र कळ्या धरताना द्यावे.

पाणी व्यवस्थापन
ॲस्टर पिकाच्या मुळ्या जास्त खोल जमिनीत जातात. त्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वापसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. साधारण ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या येण्याच्या
वेळेस पाण्याचा ताण बसणार नाही, याची दक्षता घ्यावी.

व्यवस्थापन व काढणी 
या पिकावर मावा, नागअळी, कळी पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी या किडी आणि मर, मुळ कुजवा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. लागवडीनंतर साधारणतः १० ते १२ आठवड्यांनी फुले तोडणीकरिता तयार होतात. सुटी फुले ही प्रामुख्याने हार, सजावटीसाठी वापरली जातात. फुलदाणी, गुच्छाकरिता दांड्यांची ॲस्टर फुले वापरली जातात. उत्पादन हेक्टरी ६ ते ८ मे. टन मिळते.

संपर्क- डॉ. एस. एन. लोखंडे, ७३८७६७४३२१
डॉ. व्ही. जी. नागदेवते, ९४२१८००५९०
डॉ. व्ही. एन. सिडाम, ९७६६५२९४३६
(कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.)


इतर फूल शेती
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रणसध्या दुपारचे तापमान वाढत आहे. मात्र रात्री...
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळखऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि....
ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाणॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूकयोग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे...
नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचेमोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली,...
निशिगंध लागवड तंत्रज्ञाननिशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात...
ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापनग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे...
ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जातग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची...मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी....
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...