agriculture news in Marathi, article regarding care and management of milch animals | Agrowon

गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्ष

डॉ. अनिल पाटील
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत दुधाळ गाई, म्हशींची प्रजनन प्रक्रिया सुस्थितीत दिसून येत नाही. यासाठी गाई, म्हशींचे प्रजनन व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

गाई, म्हशींच्या दुग्ध उत्पादनासाठी त्यांची प्रजननविषयक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळा ऋतू हा जनावरांच्या माजेचा, गाभण राहण्याचा व तसेच विण्यासाठी अनुकूल काळ असतो. दोन वेतातील अंतर हे कमी असायला पाहिजे, त्यासाठी गाभण काळात काळजी घ्यावी.

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत दुधाळ गाई, म्हशींची प्रजनन प्रक्रिया सुस्थितीत दिसून येत नाही. यासाठी गाई, म्हशींचे प्रजनन व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

गाई, म्हशींच्या दुग्ध उत्पादनासाठी त्यांची प्रजननविषयक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळा ऋतू हा जनावरांच्या माजेचा, गाभण राहण्याचा व तसेच विण्यासाठी अनुकूल काळ असतो. दोन वेतातील अंतर हे कमी असायला पाहिजे, त्यासाठी गाभण काळात काळजी घ्यावी.

 •  म्हशीमध्ये माजावर येण्याचा काळ २४ ते ४८ महिने असतो, देशी गाईमध्ये १८ ते २४ महिने व संकरित गाईमध्ये १८ ते २४ महिने असतो. 
 •  पहिला माज येण्याकरिता वयापेक्षा वजन वाढ ही महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे २५० ते ३०० किलो वजन झालेल्या कालवडी माज दाखवतात.
 •  गाई, म्हशींतील माजेचे चक्र हे दर २१ दिवसांचे असते. गाई, म्हशी माजावर आल्यावर जर योग्य वेळी रेतन केले पाहिजे.
 •  म्हशींमध्ये माजेचा कालावधी १२-१८ तास असतो. गाईंमध्ये १२-२४ तास असतो. संकरित गाईमध्ये ४८ तासांपर्यंत असतो. माज संपल्यानंतर १० ते १२ तासांच्या आत स्त्रीबीज सुटते. यामुळे गाई, म्हशी सकाळी माज दाखवत असतील तर ते सायंकाळी रेतन करावे. सायंकाळी माज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे.
 •   विशेषतः म्हशींमध्ये मुका माज जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे पशुपालकांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे ठरते. पशुपालकाला गाई, म्हशीतील माज ओळखता आला पाहिजे, त्याची काही लक्षणे असतात. त्यावरून माज सहजपणे ओळखता येतो. 

गाई, म्हशींतील माजाची लक्षणे  

 •    सतत ओरडणे, पान्हा सोडते.
 •    दुधाचे प्रमाण कमी होणे.
 •    अस्वस्थ असते, सतत लघवी करते.
 •    शेपटी वर करते, बाजूच्या जनावरांच्या पाठीवर पाय टाकते.
 •    माजाच्या वेळी योनीमार्गातून चिकट व पारदर्शक काचेसारखा चकाकणारा स्त्राव येतो. स्त्राव मांडीस व शेपटी खालील बाजूस चिकटलेला असतो.

गाभण काळ व्यवस्थापन 

 •    म्हशींमध्ये गाभण काळ १० महिने १० दिवस आणि गाईंमध्ये ९ महिने ९ दिवस.
 •    गाभण जनावरांची स्वतंत्र निगा करावी.
 •    सुरवातीच्या ३ महिन्यानंतर तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भ धारणेची खात्री करून घ्यावी.
 •    गाभण काळामध्ये गाई, म्हशींची जास्त हालचाल करू नये, दूरवर चालणे टाळावे. भरपूर आराम व व्यायाम द्यावा. 
 •    गाभण काळामध्ये अतिरिक्त खाद्य पुरवावे.
 •    गाभण काळात वासराच्या वाढीसाठी प्रथिने व कर्बोदकांची जास्त गरज असते.
 •    गाभण काळाचा तिसरा टप्पा फार महत्त्वाचा असतो, या काळात वासराची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे गाई, म्हशींना पौष्टिक आहार द्यावा. 

     
आहाराचे व्यवस्थापन 

 •    गाभण गाई, म्हशींना संतुलित आहार द्यावा.  खनिज युक्त मिश्रण द्यावे. जेणेकरून दूध वाढ आणि वासराच्या वाढीसाठी मदत होईल.
 •    माजाचे नियमन, गर्भधारणा व इतर प्र जनन संस्थेचे कार्य व्यवस्थित चालण्याकरिता योग्य आहाराची आवश्यकता असते.
 •    गाई, म्हशींच्या आहारात क्षार, जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके, उर्जा ही पोषणमूल्ये असणे अत्यंत गरजचे ठरते. आहारामध्ये हिरवे गवत व वाळलेला चारा असलेला संतुलित आहार द्यावा.

  -  डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६
(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

टॅग्स

इतर कृषिपूरक
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...
किफायतशीर दूध उत्पादनासाठी गाईची निवड गाईची निवड करताना शरीररचना, रंग याचबरोबर...
फायदेशीर देशी मागूर माशांचे संवर्धन कराथाई मागूर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागूरची वाढ...
देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफाव्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा...
गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाचीजनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य...
संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध...जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने...
वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा...कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात...
प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पोषकतावाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे...