agriculture news in Marathi, article regarding care and management of milch animals | Agrowon

चीक ः वासरांसाठी अमृत, मात्र दुभत्या जनावरांसाठी धोकादायक

डॉ. अनिल भिकाने,डॉ. रवींद्र जाधव
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

प्रौढ म्हशींना चीक पाजणे ही व्यवस्थापनातील चुकीची व अशास्त्रीय पद्धत आहे. प्रौढ म्हशींना चीक पाजल्याने विषबाधा किंवा अपचन होते. त्यामुळे म्हशी अडखळत चालतात. बाधित म्हैस जास्त वेळ बसून रहाते किंवा शांत उभी रहाते. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

प्रौढ म्हशींना चीक पाजणे ही व्यवस्थापनातील चुकीची व अशास्त्रीय पद्धत आहे. प्रौढ म्हशींना चीक पाजल्याने विषबाधा किंवा अपचन होते. त्यामुळे म्हशी अडखळत चालतात. बाधित म्हैस जास्त वेळ बसून रहाते किंवा शांत उभी रहाते. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

गाई, म्हशी व्यायल्यानंतर कासेतून स्रवणारे प्रथम दूध म्हणजे चीक. हा चीक नवजात वासरांसाठी परिपूर्ण अन्न असते. चिकातून नवजात वासरांच्या आहारातील विविध अन्नघटकांच्या तसेच विविध आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती इत्यादी गरजा पूर्ण केल्या जातात. चिकामध्ये दुधाप्रमाणेच शर्करा, स्निग्धांश, प्रथिने, खनिज क्षार तसेच जीवनसत्वे हे अन्नघटक आढळून येतात. दुधाशी तुलना करता चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण ३ ते ३.५ पट जास्त (साधारणपणे १५-१७ टक्के) असते. एवढ्या जास्त प्रमाणात उपलब्ध असलेली प्रथिने पचविण्याची क्षमता ही वासरांच्या एक कप्पा असलेल्या पोटामध्ये असते. त्यामुळे चीक हा वासरांसाठीचा पचनीय असा परिपूर्ण आहार आहे. नवजात वासरांना व्यायल्यानंतर दोन तासांच्या आत साधारणपणे वजनाच्या १० टक्के या प्रमाणात चीक पाजणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये वासरांच्या आतड्याची अन्नघटक विशेषतः प्रथिने शोषण क्षमता अति उत्तम असते. त्यामुळे जास्तीत जास्त अन्नघटक शोषण होऊन वासरांची प्रतिकारशक्ती चांगली राहते, वाढही उत्तम होते. 

गाई, म्हशींना चीक पाजणे नुकसानकारक 

 • व्यायलेल्या गाई, म्हशींची दुग्धउत्पादकता चांगली असल्यास जास्त प्रमाणात चीक उत्पादित करतात. अशा वेळी काही शेतकरी जास्तीचा चीक स्वतःच्या आहारात वापरतात. काही पशुपालक असा जास्तीचा चीक वाया जाऊ नये म्हणून त्याच व्यायलेल्या गाई, म्हशीला पाजतात.
 • चीक पचविण्याची प्रौढ गाई, म्हशींची क्षमता ही नवजात वासरांपेक्षा कमी असते. त्यामुळे अशाप्रकारे जर चीक प्रौढ दुभत्या गाई, म्हशीला पाजण्यात आल्यास त्यांना अल्कधर्मी  अपचन होऊन त्यातून विषबाधा होऊ शकते. 
 • महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात पशुपालक अशा प्रकारे दुभत्या जनावरांना विशेषतः म्हशींना चीक पाजतात. त्यातून विषबाधा  होत असल्याचे दिसून आले आहे. 
 • पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील शैक्षणिक पशुचिकित्सा संकुलात लातूर, नांदेड तसेच कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातून दरवर्षी साधारणपणे १५ ते २० म्हशी चिकामुळे झालेली विषबाधा किंवा अपचनाने उपचारासाठी येतात. बाधित म्हशींमध्ये चिकाचे पोटात विघटन होऊन प्रथिनांपासून अमोनिया तयार होतो, जो रक्तात शोषला गेल्यावर त्याची मेंदूवर बाधा होऊन विषबाधा तीव्र होते.

चिकामुळे विषबाधा / अपचन झालेल्या म्हशींमध्ये आढळून येणारी प्रमुख लक्षणे 

 • चारा खाणे, पाणी पिणे बंद होते. रवंथ करणे बंद होते.
 • दुग्धोत्पादन घटते. 
 • बद्धकोष्ठता होते, सुस्तपणा येतो.
 • पाजलेल्या चिकाच्या प्रमाणात पोट फुगते, गच्च होते. 
 • सुरवातीला जनावर बेचैन होते. त्यानंतर जनावरे भिंतीवर व जमिनीवर डोके घासतात. 
 • अडखळत चालतात किंवा चालताना तोल जातो.  
 • मान एका बाजूला पूर्णपणे वळवून जास्त वेळ शांत उभे रहाते. 
 • थरथर कापते किंवा गोल गोल फिरते.
 • तात्पुरते डोळ्यांना दिसत नाही. 
 • बाधित जनावर जास्त वेळ बसून रहाते किंवा शांत उभे रहाते.
 • शरीराचे तापमान, नाडी वेग व श्वसनाचा वेग साधारणपणे निरोगी जनावराप्रमाणे असतो, मात्र अतितीव्र विषबाधेमध्ये म्हशींमध्ये ग्लानी येते. अशा म्हशी बेशुद्ध पडतात. योग्य उपचार न झाल्यास दगावण्याची शक्यता असते.

म्हशींमध्ये चीक विषबाधा झालेल्याचे निदान  

 • पशुपालकाकडून माहिती घेताना, स्वतः पशुपालकाने म्हशींना चीक पाजल्याचे निष्पन्न होणे. 
 •  बाधित म्हशीच्या डाव्या पोटातील (रुमेन) द्रवाचे प्रयोगशाळेत परीक्षण. 
 • पोटातील द्रवाचा सामू हा ८ ते १० च्या दरम्यान असणे.
 • सूक्ष्मदर्शक तपासणीत पोटातील द्रवाचे परीक्षण केले असता प्रजीविंची संख्या व हालचाल कमी आढळून येणे.
 • म्हशीमधील चीक विषबाधेवर उपचार  
 •     पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील शैक्षणिक पशुचिकित्सा संकुलात म्हशींमधील चीक विषबाधेवर उपचारपद्धती प्रमाणित करण्यात आली आहे. त्यामध्ये सलाईन, गुंगीची औषधी, ब जीवनसत्त्व, रेचक औषधी, तोंडावाटे टेट्रासायकलीनच्या गोळ्या यांचा समावेश आहे. 
 • पशुवैद्यकांकडून वेळेवर योग्य उपचारपद्धतीचा अवलंब केल्यास बाधित म्हशींमध्ये २ ते ३ दिवसांत सुधारणा आढळून येते. (चंचलपणा येणे, दृष्टी येणे, खाणे व पिणे सुरू होणे, रवंथ करणे, पातळ शेण पडणे व मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे नाहीशी होणे). साधारणपणे ५ ते ७ दिवसांत अशा म्हशी पूर्णपणे बऱ्या होतात.

- डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३
 - डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३
(चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जि. लातूर)

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...