agriculture news in Marathi, article regarding care and management of milch animals in flood situation | Agrowon

पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. व्यंकटराव घोरपडे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत येते. पुराच्या पाण्याची पातळी वाढायला लागल्यावर विषारी कीटक, साप इत्यादींच्या दंशाने जनावरे दगावण्याची शक्यता असते. जास्त वेळ खाद्य व पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. पूरस्थिती निवळल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी बाधित भागामध्ये शिरकाव करून त्यातून जनावरांना मोठ्या प्रमाणात बाधा होऊन आजारी पडते.

जनावरांचे व्यवस्थापन 

महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत येते. पुराच्या पाण्याची पातळी वाढायला लागल्यावर विषारी कीटक, साप इत्यादींच्या दंशाने जनावरे दगावण्याची शक्यता असते. जास्त वेळ खाद्य व पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. पूरस्थिती निवळल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी बाधित भागामध्ये शिरकाव करून त्यातून जनावरांना मोठ्या प्रमाणात बाधा होऊन आजारी पडते.

जनावरांचे व्यवस्थापन 

  •  बाधित क्षेत्रातून जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. निवारा, चारा व स्वच्छ पाण्याचे नियोजन करावे. विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाना जनावरे बांधू नयेत.
  • दुधाळ जनावरे, गाभण जनावरे, वासरे यांना त्यांच्या गरजेप्रमाणे संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा.
  • दुषित पाण्यात भिजलेले अथवा भिजवलेले पशुखाद्य आणि वैरण जनावरांना खाऊ घालू नये.
  • आजारी जनावरांना गरजेनुसार योग्य औषधोपचार करावा.
  • वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे जनावरांवर ताण येतो. त्याचवेळी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीत आजारांसाठी (घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत) प्रतिबंधात्मक लसीकरण करणे.
  • काही ठिकाणी डास, कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास कडूनिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा, जेणेकरून जनावरांचे कीटकांपासून संरक्षण होईल.
  • सर्व जनावरांना आहारात नियमित खनिजक्षार मिश्रण द्यावे.
  • सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन व गोचीडनिर्मूलन करून घ्यावे.
  •  पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेली जनावरे जमिनीत गाडून तत्काळ विल्हेवाट लावावी. जेणेकरून दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

- डॉ. रवींद्र जाधव (९४०४२७३७४३), सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर
- डॉ. व्यंकटराव घोरपडे (९४२२०४२१९५), सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), सांगली


इतर कृषिपूरक
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...
शेततळ्यातील मत्स्यशेतीतील अडचणीवरील...आपल्या राज्यात मत्स्यतळ्यांमध्ये मासे वाढविणे हे...
स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष द्यादूध काढण्यापूर्वी जनावरांना खरारा करावा. यामुळे...
शेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी...सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन...
जनावरांमध्ये दिसताहेत `लम्पी स्कीन...गडचिरोली, बीड जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीज या...