agriculture news in marathi article regarding care should taken to be during delivery of cattle | Agrowon

प्रसुती दरम्यान जनावरांची काळजी

डॉ. एस. एस. रामटेके, डॉ. रझ्झाक
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

गाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर भागात चरण्यासाठी पाठवू नये. स्वतंत्र गोठ्यात बांधून चार पाण्याची व्यवस्था करावी. गोठा स्वच्छ असावा. गोठ्याला उतार नसावा.
 

गाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर भागात चरण्यासाठी पाठवू नये. स्वतंत्र गोठ्यात बांधून चार पाण्याची व्यवस्था करावी. गोठा स्वच्छ असावा. गोठ्याला उतार नसावा.

गाभण जनावरांना रोज थोडे चालणे व व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे त्यांचे स्नायू तसेच पंचेंद्रिये उत्तम राहतात. यामुळे प्रसूतीच्या वेळी जनावरांना त्रास होत नाही. 

 • गाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर भागात चरण्यासाठी पाठवू नये.  स्वतंत्र गोठ्यात बांधून चारा पाण्याची व्यवस्था करावी. गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. 
 • गोठ्याला जास्त उतार नसावा. उतार जास्त असल्यास गर्भाच्या वजनामुळे मायांग बाहेर येण्याची शक्यता असते. वारंवार मायांग बाहेर येत असल्यास पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावा.
 • प्रसूतीच्या दोन आठवडे अगोदर पासून गाई/म्हशीच्या पाठीच्या मागचा भाग खोलगट होतो. त्यालाच गावाकडील पशुपालक खोबे पडणे असे म्हणतात. शेवटच्या एक आठवड्यात कास ताठरते. 

प्रसूती दरम्यान घ्यावयाची काळजी  

 • सुलभ प्रसूतीसाठी कोणत्याही बाह्य शक्तीची गरज नसते. प्रसूतीसाठी आवश्यक असणाऱ्या कळा सहा ते आठ तास अगोदर सुरू होतात. त्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडे होऊन जननमार्ग तयार होतो. गाई/म्हशीमध्ये प्रसूती काळ हा २ ते ३ तासांचा असतो. जर पहिले वेत असेल तर हा काळ ३ ते ४ तास राहू शकतो. प्रसूतीचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाचे मुख उघडते आणि विस्तारते. दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर येते आणि तिसऱ्या टप्प्यात वासरांचे आवरण बाहेर येते.
 • प्रसूती वेदनांमुळे पहिल्या टप्प्यात गाई,म्हशी ऊठ बस करतात व बेचैन होतात. पोटाला ताण देतात. थोड्या थोड्या वेळांनी कळा देतात. अशा वेळी गाई/म्हशींची प्रकृती सुरक्षित अंतरावरून बघावी. प्रसूतीच्या टप्प्यात गाई,म्हशींवर सातत्याने लक्ष ठेवावा.
 • प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर येते. सर्वसाधारणपणे वासरू बाहेर यायच्या अगोदर त्यावरील पहिली पाण्याच्या पिशवी बाहेर येते आणि त्या पाठोपाठ वासरू हे तोंडाच्या दिशेने बाहेर पडते, ज्यामध्ये समोरील दोन्ही पाय आधी बाहेर येतात. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वासरांचे आवरण बाहेर येतो. सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर आठ तासाच्या आत जार बाहेर पडतो.
 • प्रसूतीनंतर लगेच गाई,म्हशीला गुळाचे पाणी पाजावे. गुघऱ्या खाऊ घालू नये. त्यामुळे गाई,म्हशीमध्ये अपचन होऊन मादी खाणे बंद करते.
 • प्रसूतीनंतर गाई/म्हशीला तिचाच चीक पाजू नये. त्यामुळे अपचन होते. त्यामुळे चारा, पाणी बंद करते.
 • प्रसूतीच्या एक दोन दिवसानंतर जर गाई, म्हशीने चारा, पाणी बंद केल्यास पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन उपचार करावा.

प्रसूतीमधील अडथळे  
प्रसूतीमध्ये निर्माण होणारे अडथळे जन्मणाऱ्या वासरामुळे तसेच विणाऱ्या मातेमुळे असू शकतात. गर्भाशय मुख पूर्ण उघडे होण्याआधीच वासरू ओढल्यास गर्भाशयमुख फाटण्याची शक्यता असते. अशावेळी वासरू पूर्णपणे प्रसूतीयोग्य स्थितीत न आल्यास वासरू अडण्याची शक्यता असते. 

अडथळे निर्माण होण्याची कारणे 
विणारी गाय, म्हैस  

 • अरुंद जन्मनलिका, गर्भाशय मुखाचा विस्तार न पावणे
 • गर्भाशयास पीळ पडणे, गर्भाशयाचे जडत्व.

जन्मणारे वासरू 

 • वासरू जन्मताना चुकीचे स्थान आणि अवस्था 
 • वासरांचा मोठा आकार
 • जन्मजात सदोष वासरू, जुळी वासरे 
 • वासरांचे विविध रोग (उदा. डोक्यात पाणी साठणे, शरीराच्या पेशिजलात पाणी साठणे)

मादी अडल्याची लक्षणे

 • गाय,म्हशीमध्ये अस्वस्थता, उठ बस करणे, सतत कळा देणे. 
 • सतत कळा दिल्यावर सुद्धा वासरू बाहेर न येणे.
 • वासराचे पाय योनी मार्गाबाहेर येतात, पण बाकीचे अवयव बाहेर न दिसणे किंवा बाहेर न येणे. 
 • पोटदुखी आणि वेदना दिसून येते, नाडी वाढणे, पोटावर लाथा मारणे, सतत उठ बस कारणे, जमिनीवर लोळते, वेदनांमुळे सतत पोटाकडे पाहणे ही लक्षणे दिसून येतात. चारा, पाणी बंद करते.

संपर्क- डॉ. एस. एस. रामटेके, ९४२२९६३५७८
(पशुचिकित्सालय संकुल,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)


इतर कृषिपूरक
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...
शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषारमोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही...
शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे...करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने...