agriculture news in marathi article regarding chicken manure | Page 2 ||| Agrowon

कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम पर्याय

सौ. सुवर्णा पोतदार, डॉ. सौ. पूनम माळी 
रविवार, 17 जानेवारी 2021

कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात.

कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात. 

सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे ०.५ टक्क्याच्या खाली चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात. 

कोंबड्यांची विष्ठा, कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत. 

कोंबडी खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडी खाद्य, जागा, पाण्याचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. साधारणतः एक हजार कोंबड्यांपासून वर्षाला १४ टन एवढे खत तयार होते. 

खताचे महत्त्व 
कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात. त्यात नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, युरिक ॲसिड या प्रकारांत आढळते. मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, सोडिअम, फेरस, मंगल, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक, कॉपर इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
 
खत तयार करण्याची पद्धत 

 • पोल्ट्री शेडमधील लिटर शेडच्या बाहेर काढल्यानंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत. 
 • एक टन कोंबडी लिटरसाठी दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक मिसळावे. 
 • पुरेसा ओलावा (३० ते ४० टक्के) राहील एवढे पाणी शिंपडावे. 
 • खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा नियमित चाळणी करावी. 
 • खताच्या ढिगाचे तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअस एवढे राखावे. 
 • चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो. 
 • सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपात ही तयार करतात. कोंबडी खताच्या पॅलेट  ५ ते २५ किलोच्या बॅगेत मिळतात. 

चांगल्या खताचे गुणधर्म 

 • खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा 
 • खताचा सामू ६.५- ७.५ दरम्यान असावा. 
 • कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा. 
 • कर्ब नत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यान असावे.
 •  जलधारणाशक्ती ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी. 

खत वापरण्याची पद्धत 

 • मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी. 
 • ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
 • उभ्या पिकात खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. नसेल तर पीक पिवळे पडते. ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये. 
 • जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी ५ ते २० टन खताचा वापर करावा. 

संपर्क - सौ. सुवर्णा पोतदार,  ७६६९५१७१११
(मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, जयवंतराव भोसले कृष्णा कषी महाविद्यालय, रेठरे बु., जि. सातारा)


इतर कृषिपूरक
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले...
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...