agriculture news in marathi Article regarding the cultivation of Bersim | Agrowon

पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते फायदेशीर

डॉ. सर्फराजखान एच. पठाण
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा दुग्धव्यावसायिकांसाठी सतत भेडसावणारा प्रश्न असतो. त्यासाठी बरसीम घास हे रब्बी हंगामात ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे.
 

द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा दुग्धव्यावसायिकांसाठी सतत भेडसावणारा प्रश्न असतो. त्यासाठी बरसीम घास हे रब्बी हंगामात ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे.

बरसीम हे रब्बी हंगामातील प्रमुख द्विदल वर्गीय चारा पीक आहे. सर्वसाधारणपणे मेथी सारख्या दिसणाऱ्या पिकाची उंची ही लसूण घासाएवढी असते. काही भागात या पिकास 'घोडा घास' असेही म्हणतात. या पिकाचा चारा रुचकर, पालेदार, लुसलुशीत, सकस व चविष्ट असतो. या प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला चांगला मानवतो. या पिकाच्या ४ ते ५ कापण्या होऊन भरपूर हिरवा चारा मिळत असल्याने हे पीक अनेकार्थाने फायदेशीर ठरते.

जमीन व हवामान 

  • बरसीम पिकास मध्यम ते भारी प्रतीची व पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत जमीन चांगली मानवते.
  • हे पीक थंड आणि उबदार हवामानास उत्तम प्रतिसाद देते. जेवढा थंडीचा कालावधी जास्त तेवढ्या बरसीमच्या कापण्या अधिक मिळतात. शिवाय चारा उत्पादनही भरपूर मिळते.

पूर्वमशागत 
एक नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देवून जमीन चांगली भुसभुशीत करावी.
जमिनीची क्षमता, उंची व सखलपणा विचारात घेऊन ती सपाट करावी. नंतर ५x३ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.

सुधारित वाण 
वरदान, मेस्कावी

खताची मात्रा 
पेरणीपूर्वी उपलब्धतेनुसार हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होण्यास मदत होते. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट आॉफ पोटॅश) मिश्रण करून पेरणीपूर्वी द्यावे.

बियाणे व पेरणी 
५x३ मीटर आकाराचे तयार केलेल्या वाफ्यात बियाणे फोकून पेरणी करण्यासाठी हेक्टरी ३० किलो बियाणे लागते. वाफ्यात ३० से.मी अंतरावर मार्करच्या साहाय्याने पेरणी करावयाची असल्यास हेक्टरी २५ किलो बियाणे पुरेसे होते.

बीजप्रक्रिया 
पेरणीपूर्वी प्रथम बियाणास ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे ट्रायकोडर्मा, मॅन्कोझेब अथवा कार्बेन्डाझीम या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. रोपांचा बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम रायझोबीयम जिवाणू संवर्धन व स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पी.एस.बी) चोळावेत. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळल्यामुळे पिकास उपलब्ध होतात.

पेरणीची वेळ 

  • पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच करावी.
  • पेरणी लवकर केल्यास थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही. सुरवातीची वाढ जोमदार होत नाही.
  • उशिरा पेरणीमुळे शेवटच्या कापण्या मार्च अथवा एप्रिल महिन्यात येतात. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

आंतरमशागत 

  • हे पीक तणाच्या चढाओढीस संवेदनशील असते. म्हणून सुरवातीलाच तणांचा प्रादुर्भाव कमी असला तर पुढे तणाचा जोर कमी होतो. म्हणून योग्य वेळीच आवश्यकतेनुसार एक किंवा दोन निंदण्या कराव्यात.
  • पेरणी बियाणे फोकून केल्यास तण खुरपणी त्रासदायक व खर्चिक ठरते. म्हणून पेरणी शक्यतो ३० सें.मी अंतरावर मार्करच्या साहाय्याने करावी.
  • म्हणजे हातकोळप्याद्वारे जवळ-जवळ ७५ टक्के तण नियंत्रण शक्य होते. उर्वरित क्षेत्र खुरपणीद्वारे तण विरहित ठेवता येते.

पाणी पुरवठा 
रब्बी हंगामातील या पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर पाण्याची पाळी येईल, या प्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिक मिळते.

चाऱ्याची कापणी 
हिरव्या चाऱ्यासाठी बरसीमची पहिली जावळ कापणी साधारणतः पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे आक्टोबरमध्ये पेरणी केल्यास बरसीमद्वारे ४ ते ५ कापण्या घेणे सहज शक्य होते. पेरणीस उशीर झाल्यास ३ ते ४ कापण्या मिळतात.

हिरव्या चाऱ्याचे उत्पादन 
योग्य व्यवस्थापन केल्यास बरसीम पिकाचे ४ ते ५ कापण्याद्वारे हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

संपर्क- डॉ. सर्फराजखान पठाण, ८१४९८३५९७०
(सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग व प्रक्षेत्र प्रमुख, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...