agriculture news in Marathi, article regarding cultivation of paddy | Agrowon

पेरणी पद्धतीने भात लागवड

डॉ. आनंद गोरे, एस. बी. बोरगावकर
शुक्रवार, 12 जुलै 2019

भाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. बियाणे ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी अंबिका, तेरणा, प्रभावती, पराग, परभणी आविष्कार या जातींची निवड करावी.

भात पिकासाठी काळी, भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. ४ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत देखील भाताचे उत्पादन घेतले जाऊ शकते. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. 

भाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. बियाणे ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी अंबिका, तेरणा, प्रभावती, पराग, परभणी आविष्कार या जातींची निवड करावी.

भात पिकासाठी काळी, भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. ४ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत देखील भाताचे उत्पादन घेतले जाऊ शकते. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. 

 •  हेक्‍टरी ६० किलो बियाणे वापरावे. जोमदार उगवण व करपा रोग प्रतिबंधक उपाय म्हणून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. यासाठी बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात मिसळावे) बुडवावे. वर तरंगणारे हलके, पोचट व रोगट बियाणे काढून टाकावे. तळाला राहिलेले जाड बियाणे स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळेस धुवून २४ तास सावलीत वाळवावे. वाळलेल्या बियाणास प्रतिकिलो २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणास प्रक्रिया करावी. 
 •  १५ जुलै पर्यंत पेरणी पूर्ण करावी.  दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. बियाणे ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

खत व्यवस्थापन  
अ) बागायती 

 •  ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. खत मात्रा तीन हप्त्यांत द्यावी. 
 •   पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, १०० टक्के स्फुरद व पालाश पेरून द्यावे. 
 •   पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्र द्यावे. 
 •  पेरणीनंतर ६० दिवसांनी राहिलेले ३० टक्के नत्र द्यावे. 

ब) जिरायती ः 

 •  ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद, ३० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे.
 •   नत्राची ५० टक्के मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळी द्यावे.
 •   राहिलेल्या नत्राची ५० टक्के मात्रा फुटवे येण्याच्या वेळी द्यावी. 

पाणी व्यवस्थापन 
पावसात खंड पडून जमिनीत बारीक भेगा पडतात, तेव्हा पाणी देणे आवश्‍यक आहे. पीक निसवताना पाण्याचा ताण पडल्यास लोंबी पोंग्यान पूर्णपणे बाहेर पडत नाही. त्यामुळे उत्पादन घटते. अशा वेळी पाणी देणे आवश्‍यक आहे. 

आंतर मशागत 
दोन कोळपण्या व दोन खुरपण्या अनुक्रमे तीन व सहा आठवड्यांनी कराव्यात. त्यामुळे जमिनीच्या भेगा कमी होऊन ओलावा टिकून ठेवण्यात मदत होते. 

 

सुधारित जाती 
अ) जिरायती  
अंबिका ः

 •     ११० ते ११५ दिवसांत तयार होते.
 •     पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली, फुटवे जास्त आणि एकाच वेळी पक्व होतात.
 •     करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडते. 
 •     उत्पादन ः १७ ते २० क्विंटल प्रतिहेक्‍टरी

तेरणा (म.कृ.वि.- ९) ः

 •     १०० ते १०२ दिवसांत तयार होते. 
 •     करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
 •     तांदळाचा रंग पांढरा, लांब दाणा, प्रत उत्तम.
 •     उत्पादन ः १९ ते २२ क्विंटल प्रतिहेक्‍टरी.

 ब) बागायतीसाठी जाती ः 
प्रभावती (पी. बी. एन.- १) 

 •  ११५ ते १२० दिवसांत तयार होते. मध्यम बुटकी जात, फुटव्यांचे प्रमाण चांगले, जमिनीवर लोळत नाही. 
 •   दाणा मध्यम, सुवासिक. 
 •  भारी काळ्या जमिनीत बागायतीसाठी योग्य. लोह कमतरतेस सहनशील. पाणी व खतास उत्तम प्रतिसाद
 •  उत्पादन ः  ३५ ते ४० क्विंटल प्रतिहेक्‍टरी.

पराग ः

 •   १०५ ते ११० दिवसांत तयार होते.
 •    मध्यम बुटका, कमी प्रमाणात लोळतो. लोह कमतरतेस सहनशील.
 •    तांदळाची प्रत उत्तम.
 •    उत्पादन ः  ४० ते ४२ क्विंटल प्रतिहेक्‍टरी 

परभणी अविष्कार ः 

 •   ११५ ते ११७ दिवसांत तयार होते. 
 •    मध्यम बुटका, लोह कमतरतेस बळी पडत नाही. 
 •    तांदूळ सुवासिक, तांदळाची लांबी पराग जातीपेक्षा जास्त. करपा रोगास प्रतिकारक.
 •   उत्पादन ः ३२.३४ क्विंटल प्रतिहेक्‍टरी

पी.बी.एन.आर.- ०३-२ ः 

 •  १०५ ते ११० दिवसांत तयार होते. मध्यम बुटका, जमिनीवर लोळत नाही. 
 •   लांबट आकाराचा तांदूळ, चांगली गुणवत्ता.
 •   उत्पादन ः  ३६-३८ क्विंटल प्रतिहेक्‍टरी
   

- एस. बी. बोरगावकर ः७५८८०८२१६६                                                                                  
(पेरसाळ संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर तृणधान्ये
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...