agriculture news in Marathi, article regarding disease control in sheep and goat | Agrowon

शेळ्या, मेंढ्यांमधील जिवाणूजन्य आजार

डॉ. विठ्ठल धायगुडे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

शेळ्या, मेंढ्यांमध्ये आंत्रविषार, सांसर्गिक फुफ्फुसदाह, घटसर्प आणि काळपुळी हे जिवाणूजन्य आजार दिसतात. या आजाराची लक्षणे ओळखून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करावी.

आंत्रविषार

 • आजारामध्ये ३ ते १० आठवड्यांची पिल्ले बळी पडतात.
 • आजार पिल्लांना जरुरीपेक्षा जास्त आहार दिल्यामुळे होतो. जिवाणू आतड्यात विषारी पदार्थ तयार करतात.

लक्षणे 

शेळ्या, मेंढ्यांमध्ये आंत्रविषार, सांसर्गिक फुफ्फुसदाह, घटसर्प आणि काळपुळी हे जिवाणूजन्य आजार दिसतात. या आजाराची लक्षणे ओळखून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करावी.

आंत्रविषार

 • आजारामध्ये ३ ते १० आठवड्यांची पिल्ले बळी पडतात.
 • आजार पिल्लांना जरुरीपेक्षा जास्त आहार दिल्यामुळे होतो. जिवाणू आतड्यात विषारी पदार्थ तयार करतात.

लक्षणे 

 •  लहान पिल्लांना पातळ हगवण सुरू होते. काही तासांनंतर करडे अशक्तपणामुळे जमिनीवर कोलमडून पडतात. त्यानंतर त्यांना चक्कर येते. त्यातच त्यांचा मृत्यू होतो.

प्रथोमोपचार 

 • करडांना हगवण सुरू झाल्यास मीठ पाण्याचे किंवा इलेक्‍ट्रोलाइटचे द्रावण पाजणे सुरू करावे.
 • लागण झालेल्या करडांना स्वतंत्र बांधून ठेवणे म्हणजे इतरांना संसर्ग होणार नाही.

उपचार 

 • तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतीजैविक ग्लुकोज द्रावणातून द्यावे.विषारी पदार्थाची तीव्रता कमी करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावा.

प्रतिबंधक उपाय 

 • गोठ्याची स्वच्छता ठेवावी. जास्त कार्बोदकयुक्त आहार जास्त प्रमाणात देऊ नये.
 • हगवण लागलेल्या पिलांना ताबडतोब वेगळे करून त्यांच्यावर औषधोपचार तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून करून घ्यावा.
 • आजार होऊ नये यासाठी आंत्रविषार प्रतिबधंक लसीकरण करावे.

प्राथमिक लसीकरण 

 • जन्मानंतर सातव्या दिवशी जर शेळी, मेंढी गाभण असताना लसीकरण केले नसेल तर ३ महिने व त्यापेक्षा जास्त वय झाल्यावर लसीकरण करून घ्यावे.

इ- कोलाय संसर्ग 
   जंतूंचा संसर्ग लहान करडांना झाला तर मृत्यू येतो.
कारणे 

 • आईच्या गर्भाशयातून येणाऱ्या जंतूयुक्त स्त्रावाशी पिलांना होणारा उपसर्ग
 • नाळ तसेच घश्‍याद्वारे जंतूंचा शिरकाव
 • चिकाची दुधाची कमतरता
 • वातावरणातील एकदम बदल
 • शेळी, मेंढीच्या आईच्या खाद्यातील कार्बोदके किंवा प्रथिनांची कमतरता तसेच जीवनसत्त्व अ आभावही कारणीभूत ठरू शकतो.
 • गोठ्यातील अस्वच्छता.

लक्षणे 

 • करडांना पांढऱ्या रंगाची हगवण लागते.
 • करडे दूध पिणे कमी किंवा बंदच करतात.
 • मृत्यूपूर्वी करडे अंग कडक करतात.

प्रथमोपचार 

 • आजारी करडांना ताबडतोब वेगळे ठेवावे.
 • मीठ-पाणी किंवा ईलक्‍ट्रोलाईटचे द्रावण पाजावे.
 • करडांना गरम कपड्यात किंवा घोंगडीत गुंडाळून ठेवावे.

उपचार 

 • आजार जिवाणूजन्य असल्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैवकांचा वापर क्षारयुक्त सलाईनमधून करणे अत्यावश्‍यक आहे.
 • तज्ज्ञांच्या सल्ल्याने जीवनसत्त्व अ,ब१,क द्यावे. प्रतिबंध करण्यासाठी चीकयुक्त दूध योग्य प्रमाणात पाजावे.
 • सांसर्गिक फुफ्फुसदाह

कारणे 
   दूषीत हवा व वातावरण, आजारी शेळी, मेंढी कळपामध्ये आणल्यामुळे आजाराचा फैलाव झपाट्याने होता.

लक्षणे 

 • साधारणत: प्रार्दुभावानंतर ७ ते १० दिवसांनंतर लक्षणे दिसतात.
 • शरीराचे तापमान वाढते. (१०५ ते १०६ अंश फॅरेनाइट). श्‍वास घेण्यास त्रास होतो, नाकातून पाणी गळते.
 • शेवटच्या काळात तोंडाने श्‍वासोच्छ्वास घेतात. जीभ बाहेर असते. तोंडातून लाळ फेस येतो.

उपचार 

 •    पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा.

फाशी किंवा काळपुळी 

 •    रानात चरत असलेली शेळी, मेंढी संध्याकाळी चरून आल्यावर एकाएकी चक्कर आल्यासारखी गोल गोल फिरून जमिनीवर पडते. पाय झाडते.

लक्षणे 

 •    बहुतेक वेळी कोणतेही लक्षण न दाखवता शेळी, मेंढी अचानक दगावते.
 •    मेल्यानंतर किंवा मरताना नाकातून, कानातून, गुद्दद्वारावाटे काळसर रक्त येते. ते गोठत नाही.
 •    तडकाफडकी मृत्यू होतो.
 •    ताप येतो (१०५-१०६ अंश फॅरानाइट), शेळी सुस्त होणे. श्‍वास घेण्यास त्रास होतो. हगवण लागते.

निदान 

 •    लक्षणे तपासावीत.
 •    पशुवैद्यकाकडून चाचण्या करून घ्याव्यात.

घटसर्प
   ट्रकमध्ये जास्त प्रमाणात शेळ्या, मेंढ्यांचा १२ तास प्रवास होतो, त्यांना पुरेसे अन्न, पाणी मिळत नाही. उन्हामध्ये जास्त वेळ फिरविणे, कडाक्‍याची थंडी, सतत पावसाची झड इत्यादी कारणे या आजारास पोषक वातावरण निर्माण करतात.
लक्षणे 

 •    शरीराचे तापमान वाढते (१०५ - १०६ अंश फॅरानाइट).
 •    नाकातोंडातून पाणी गळते, श्‍वसनास त्रास होतो. चरणे व रवंथ करणे कमी किंवा बंद होते. एक दोन दिवसांत घशातून घर घर असा आवाज येतो.

उपचार 
   पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची इंजेक्‍शन टोचून घ्यावे.
प्रतिबंध 
   एकदम वातावरण बदल करू नये. प्रवासा दरम्यान त्यांना अन्नपाणी नियमित आंतराने द्यावेत.
   प्रवासादरम्यान येणारा ताण कमी करावा.
लसीकरण 

 •    करडे ः ३ महिने किंवा जास्त वय असलेल्या करडांमध्ये २.५ मि.लि. कातडीखाली.
 •    शेळ्या, मेंढ्या ः दरवर्षी मार्च महिन्यामध्ये ५ मि.लि. कातडीखाली
 •    लसीकरण पशू तज्ज्ञाकडून करून घ्यावे.

- डॉ. विठ्ठल धायगुडे ९८६०५३४४८२  

   ( क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
 

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावरांमध्ये दिसतोय ‘लंपी स्कीन डिसीज'राज्याच्या काही भागात लंपी स्कीन डिसीज हा गो व...
दुधाळ जनावरांतील किटोसीस, दुग्धज्वरावर...दुधाळ जनावरातील चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे...
जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोलाजनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी,...
व्यवस्थापन गाभण शेळ्यांचेशेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...