संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहा

साथीचे आजार टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण करावे.
साथीचे आजार टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण करावे.

पावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि आरोग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. प्रतिबंधक उपाययोजनेवर पशूपालकांनी भर द्यावा.

न्यूमोनिया  

  • शेळ्या, मेंढ्यामध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे गोठ्यातील सततचा ओलावा. 
  • आजार विषाणू, जीवाणू व बुरशीमुळे होतो. दूषित चारा व पाणी दिल्यामुळे आणि जनावर सतत पावसात भिजल्यामुळे देखील आजार होतो.
  • लक्षणे 

  •  प्रथम जनावरास ताप येतो. चारा खाणे, रवंथ करणे कमी होते.
  •  नाकातून स्त्राव चालू असतो. घरघर आवाज येतो. तोंडाने श्‍वासोच्छवास करतात. जीभ बाहेर येते. 
  • उपचार ः  

  •  लक्षणानुसार उपचार करावेत. 
  •  निलगिरीचे तेल गरम पाण्यात मिसळून जनावरांना त्याची वाफ द्यावी. 
  •  पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत. 
  • प्रतिबंधक उपाय ः 

  •  गोठा स्वच्छ ठेवावा. जनावरांना स्वच्छ पाणी व सकस चारा द्यावा. 
  •  गोठ्यातील जमीन कोरडी ठेवावी.  जनावरांना मोकळ्या सूर्यप्रकाशात, मोकळ्या हवेत बांधावे. 
  • घटसर्प 

  •  संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. 
  •  आर्द्रतायुक्त वातावरणात जनावरांना संसर्ग होतो.
  •  प्रथम जनावरांस भयंकर ताप येतो.  
  • जनावरांना गिळताना व श्‍वास घेताना त्रास होतो.
  • उपचार 

  •  तीव्रता जास्त असल्यामुळे जनावर २४ तासांत दगावते. 
  •  पशूतज्ज्ञांकडून सूज, ताप व वेदना कमी करणारी औषधे द्यावीत. 
  •  जनावराला श्‍वास घेताना त्रास होत असेल तर शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे. 
  • प्रतिबंध 

  •  दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण आवश्यक आहे. 
  • फाशी 

  •  आजार गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्यामध्ये झपाट्याने पसरतो.  
  •  आजार प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी पाऊस पडल्यानंतर आणि पावसाळ्याच्या सुरवातीला होतो.
  • लक्षणे ः 

  •  अतितिव्र स्वरुपाच्या आजारात जनावरे कुठलेही पूर्वसूचक लक्षण न दाखवता १ ते २ तासांत दगावतात. 
  •  नाक, तोंड, कान, गुदद्वारातून काळसर न गोठलेले रक्त स्त्रावते.
  •  तीव्र स्वरुपाच्या आजारात जनावरास भरपूर ताप येतो. तोंडावाटे लाळ येते. पोट फुगते.
  •  जनावरे खाणे-पिणे बंद करतात. रक्तमिश्रित हगवण व श्‍वसन कष्टप्रवण होते. 
  • उपचार ः  

  •  कमी तीव्र स्वरुपाच्या आजारी जनावरांना पशूतज्ज्ञांच्याकडून प्रतिजैवकाची मात्रा द्यावी. 
  • प्रतिबंधक उपचार ः   रोग नेहमी होत असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे. 

    फऱ्या

  • पावसाळ्याच्या सुरवातीस अधिक प्रमाणात होतो. तरी हा आजार सर्वच मोसमात होतो. 
  •  आजार प्रामुख्याने ६ ते २४ महिने वयाच्या विशेषतः सुदृढ जनावरांना जनावरांना होतो.
  • आजारात प्रथम भयंकर ताप येतो. मुख्यतः हे रोगजंतू जनावरांच्या स्नायुमध्ये राहतात. वायू आणि विष तयार करून विविध शरीर क्रियेमध्ये अडथळे आणतात. 
  •  जनावरे मागच्या पायाने लंगडतात. पुढील, मागील पायाच्या फऱ्यावर मोठ्या प्रमाणात सूज येते. सुजलेल्या भागावर बोटाने दाबल्यास चरचर आवाज येतो. 
  • उपचार ः 

  •  आजाराचे निदान झाल्यास पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने पेनिसिलिनचे इंजेक्‍शन शरीराच्या वजनानुसार जनावरांच्या स्नायुमध्ये व सुजलेल्या भागात द्यावे लागते. 
  •  प्रतिबंधात्मक उपाय ः 

  •  संपूर्ण प्रतिबंधासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करावे. 
  • - डॉ. फेरोझ सिद्दिकी, ९९६०१४७१७१,  ( पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com